लोकसभेला शरद पवारांच्या विरोधात बोललात अन् आता…; जयंत पाटलांचा अतुल बेनकेंवर हल्लाबोल

| Updated on: Nov 11, 2024 | 7:32 AM

Jayant Patil Junnar Sabha Full Speech : पुण्यात जयंत पाटील यांची सभा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा जयंत पाटील यांनी यावेळी साधला. जुन्नरमधील या सभेत जयंत पाटील काय म्हणाले? वाचा...

लोकसभेला शरद पवारांच्या विरोधात बोललात अन् आता...; जयंत पाटलांचा अतुल बेनकेंवर हल्लाबोल
जयंत पाटील, नेते, राष्ट्रवादी शरद पवार गट
Image Credit source: Facebook
Follow us on

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. यासभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केलं. इथं जुन्नरमध्ये येऊन सभा घेण्याची माझी गरज नव्हती. सभा ही विजयाची घ्यायची असते. आपले उमेदवार हे आपला विश्वास घेऊन पुढे गेले आहेत ते विजयी होतील. आमच्याकडे सर्वांनी उमेदवारी मागितल्या होत्या. समोर उभे असलेल्या दोन उमेदवारांनी सुधा उमेदवारी मागितली होत्या. त्यांनी सांगितले पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याशिवाय आम्ही निवडून येत नाही. पवार साहेबांच्या आशीर्वाद असल्याशिवाय जुन्नर विधानसभा निवडणुका लढवता येत नाही आणि विजयी होत्ता येत नाही. तो आशीर्वाद आता सत्यशील शेरकर यांच्या पाठीवर आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटलांचा अतुल बेनकेंना टोला

अतुल बेनके यांच्याकडून प्रचारादरम्यान अमोल कोल्हे यांच्या नावाचा वापर करण्यात आला. यावरून जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. पूर्वी अतुल बेनके आणि अमोल कोल्हे यांची जोडी होती, असाच प्रचार आता अतुल बेनके करत आहेत. लोकसभेला अमोल कोल्हेसाहेबांना पाडण्यासाठी तुम्ही प्रचार केला. शरद पवार यांच्या विरोधात तुम्ही बोलला. त्याच वेळेस जुन्नर तालुक्यात नवीन जोडी तयार झाली. ती म्हणजे अमोल आणि सत्यशील शेरकर… माणसं खूप हुशार आहे जोड्या लावायला आणि जोड्या तोडायला, असं म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे आमदार बेनके यांना टोला लगावला आहे.

सरकार आपलं येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कुकडीच्या नेटवर्कमध्ये पाणी उपलब्ध होणं अवघड आहे. पठारावर पाणी उपलब्ध करण्याची माझी जबाबदारी आहे. आपल्याला कुणाचंही पाणी अडवयाचं नाही. बिबट प्रश्न सध्याच्या सरकारला सुटला नाही. नुसती घोषणा… बिबट बरोबर राहायची सवय लावली पाहिजे. आमचे सगळे बिबट निघून गेले, असं म्हणत पक्ष सोडून गेलेल्यांना जयंत पाटील यांनी चिमटा काढला आहे.

फडणवीसांवर निशाणा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. चुकीचा नेरेटिव्ह सेट करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. देवेंद्र फडणवीस सांगतात सुरत लुटली, असं बोलू नका… का? तर अमित शाहांना वाईट वाटेल! पुतळा वाऱ्यामुळे पडला तर त्या ठिकाणी एकही झाड का पडलं नाही. फक्त पैसा खाण्यासाठी महाराजांच्या पुतळा उभारला, असं जयंत पाटील म्हणाले.