Video : सुसंस्कृत राजकारणाचा धडा, विजयानंतर धंगेकरांनी मुक्ता टिळक यांच्या घरी जाऊन वाहिली आदरांजली

| Updated on: Mar 02, 2023 | 8:06 PM

पुण्याच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवलेल्या धंगेकरांनी आपल्या एका कृतीतून सुसंस्कृत राजकारणाचा धडा सर्वांना दिला आहे.

Video : सुसंस्कृत राजकारणाचा धडा, विजयानंतर धंगेकरांनी मुक्ता टिळक यांच्या घरी जाऊन वाहिली आदरांजली
Follow us on

पुणे : पुण्याच्या पोटनिवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं. भाजप आणि महाविकास आघाडीने आपली सर्व ताकद लावली होती. आज निकाल आणि अनपेक्षितपणे कसबा मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला. गेली 28 वर्षे भाजपच्या ताब्यात असलेला कसबा मतदारसंघ भाजपच्या हातातून गेला. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा 11 हजारापेक्षा जास्त मतांनी विजय झाला. निकाल लागल्यावर धंगेकर यांच्या समर्थकांनी रॅली काढली आणि गुलाल उधळत जल्लोष केला. पोटनिवडणुकीत विजय मिळवलेल्या धंगेकरांनी आपल्या एका कृतीतून सुसंस्कृत राजकारणाचा धडा सर्वांना दिला आहे.

विजय मिळवल्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी संध्याकाळी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी केसरी वाड्यामध्ये जाऊन आदरांजली वाहिली. धंगेकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकारणात सर्व काफी माफ असतं असं बोललं जातं आणि आज एकत्र असलेले उद्या एकमेकांचे कट्टर शत्रू झालेले आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिले आहेत. मात्र अशा खेळामेळीने निवडणुका झाल्या तर वाद होणार नाहीत.

 

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यात पोटनिवडणूक लागली त्यानंतर भाजपकडून टिळक यांच्या घरात उमेदवारी दिली जाईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र भाजपच्या वरिष्ठांनी हेमंत रासने यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर टिळक यांच्या घरातील नाराज झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर टिळक कुटुंबियांनीही रासने यांना पाठिंबा दिला.

हेमंत रासने यांच्या उमेदवारीने ब्राह्मण समाज नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र भाजपने आपला उमेदवार काही मागे घेतला नाही त्यानंतर आनंद दवे यांनीही उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे धंगेकर यांच्या प्रचाराला महाविकास आघाडीमधील दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. निवडणुकीच्या आधी धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी उपोषण केलं होतं. भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, पोटनिवडणुकीच्या राजकीय नाट्यानंतर निकाल लागणं सुरू झाल्यावर रविंद्र धंगेकरांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती ती शेवटपर्यंत आघाडी टिकवून ठेवली आणि धंगेकरांनी इतिहास रचला. भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला.