उत्तर प्रदेशच्या ज्या जागेवर सध्या राम मंदिर उभारण्यात आलं आहे. त्या जागेचा निकाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या काळात देण्यात आला. ही जागा दोन धर्मांच्या भावना या जागेशी जोडलेल्या होत्या. त्यामुळे अतिशय संवेदनशील असा हा मुद्दा होता. या केसचा निकाल देताना काय विचार केला? याबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यांनी मत व्यक्त केलं. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर हे चंद्रचूड यांचं मूळ गाव आहे. या गावाला धनंजय चंद्रचूड यांनी भेट दिली. यावेळी राम मंदिराच्या ऐतिहासिक निकालावर त्यांनी भाष्य केलं.
अयोद्धेतील राम मंदिर जागेच्या वादाची केस माझ्यापुढे आली. त्यावर तीन महिने विचार करत केला. तेव्हा एक जाणवलं की, शेकडो वर्ष प्रलंबित राहिलेला विषय आमच्यापुढे आला आहे. त्यावेळी यावर मार्ग कसा काढायचा? असा प्रश्न समोर आला. त्यावेळी देवाच्या समोर बसून अयोद्धेच्या केसचा मार्ग तुम्हीच शोधून द्या, अशी विनंती देवांना केली. आपला विश्वास आणि आस्था असेल तर मार्ग देव शोधून देतातच, असं सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलं.
धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या कनेरसर गावाला भेट दिली. तेव्हा त्यांनी लहानपणीच्या आठवणी जागवल्या. दहा वर्षानंतर गावाला आलो आहे. आज सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु या ओवीतुन गावक-यांचे प्रेम जिव्हाळा आपुलकी अशा शब्दात चंद्रचुड यांनी माऊलींच्या ओवीचा आधार घेत गावक-यांच्या सन्मानाने भारावून गेलो आहे, असं ते म्हणालेत.
काळ बदलतोय तसं आपण काळाबरोबर बदलतोय तशीच गावची प्रगती झाली आहे. आपल्या गावाची सुधारणा आणि प्रगती जाणून आली. आपल्याला पूरक आणि पोषक बदल स्विकारत पुढे जाण्याचा होण्याचा प्रयत्न होतो. आयुष्यात पुढे जात असताना खोलवर रुजलेली आपली नाळ मुळं विसरत नाही. आपल्या मुळं गावी भेट देताना माझ्या पुर्वजनांसह गावक-यांचा अभिमान वाटतो. गावकरी कायम संपर्कात असतात. पूर्वज ज्या मातीतून घडले त्या मातीचं ऋण आठवण मनात साठवतो आहे, असं धनंजय चंद्रचूड म्हणाले.