पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघात प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघातामधील आरोपी असलेल्या वेदांत अग्रवाल याला जामीन मंजुर झाला आहे. बड्या उद्योजकाच मुलगा असलेला वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याने अटी शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हा घडलेला अपघात इतका भीषण होता की जागीच दोघांचा मृत्यू झाला. ज्या अटींवर त्याला जामीन दिला आहे त्या अटींमध्ये 15 दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबलसोबत वाहतूक नियंत्रण करावं लागणार आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथून टू-व्हीलवर जाणाऱ्या एका कपलला स्पोर्ट्स कारने जोरात धडक दिली. ह धडक इतकी जोरात होती की तरूणी गाडीवरून 10 फूट हवेत उडाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर गाडी चावणाऱ्या तरूणाने उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. दोघेही राजस्थानचे असून अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वेदांत अग्रवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबल सोबत चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत. वेदांत अग्रवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागणार या अटींवर जामीन मंजुर करण्यात आला आहे.
A speeding Porsche driven by Vedant Agarwal rammed into a two wheeler killing the rider and the pillon on the spot. The incident occurred at around 3:30 in Kalyaninagar. @PuneCityPolice @PuneCityTraffic #accident #kalyaninagar #pune pic.twitter.com/UtbuZNJlow
— saheer shaikh (@sahirshaikh777) May 19, 2024
या अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्पोर्ट्स कार तब्बल 200 च्या स्पीडने असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं सांगितलं. अपघातामधील दोघांच्या मृत्यूनंतर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंढव्यातील Cosie बार विरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन केलं आहे. रात्री याच बारमध्ये पार्टी करून त्या अल्पवयीन मुलाच्या कारने धडक तरुण-तरुणीच्या दुचाकीला धडक दिली होती. या बारमधून अल्पवयीन मुलांना दारू विक्री होत असल्याचा भाजप युवा मोर्चाने आरोप केला आहे.