पुणे : पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट (Pune Corona lockdown update) होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील. तसेच दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. (Pune Corona lockdown update : SSC, HSC, MPSC exams will be held at the scheduled time)
याबाबत सौरभ राव म्हणाले, “परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील”. बेडची संख्या वाढवणार,टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.
सौरभ राव यांनी सांगितले की, दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. त्यात कोणताही बदल केला जाणार आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असेही राव यांनी यावेळी स्पष्ट केले. व्यायामशाळा सुरु राहतील. पुण्यात दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
– पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम
– पुढील आठवड्यापर्यंत भयावह परिस्थिती
– पुन्हा एकदा पुण्यात बेडची कमतरता जाणवणार
– जिल्ह्यात मृत्युदरही वाढण्याची शक्यता
– आठवड्याची परिस्थिती पाहता निर्बंध कडक लागण्याची शक्यता
– बैठकीत लॉकडाऊन नकोचा सूर पण कडक निर्बंध लावण्याची मागणी
2 एप्रिल 2022
एकूण बेड्सची स्थिती
– ऑक्सिजन बेड्स – 9118
– ऑक्सिजन विरहीत बेड्स – 41093
– आयसीयु बेड्स – 2927
– व्हेंटिलेटर्स बेड – 996
उपचार बेडची स्थिती
ऑक्सिजन बेडवर उपचार संख्या – 2974
ऑक्सिजन विरहीत बेडवर उपचार संख्या – 11563
आयसीयु बेडवर उपचार संख्या – 1073
व्हेंटिलेटर्स बेडवर उपचार संख्या – 376
शिल्लक बेडची स्थिती
– ऑक्सिजन बेड्स – 6144
– ऑक्सिजन विरहीत बेड्स – 29530
– आयसीयु बेड्स – 1854
– व्हेंटिलेटर्स बेड – 620
रुग्ण संख्येची स्थिती
– ऍक्टिव्ह रुग्ण – 61740
– रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या – 15986 ( यामधील गंभीर रुग्ण 4423 )
– घरी उपचार घेणारे रुग्ण – 45754
12 एप्रिल पर्यंतचा प्रशासकीय अनुमान
– ऑक्सिजन विरहित फक्त 9 बेड्स शिल्लक राहतील
– 3207 ऑक्सिजन बेडची कमतरता भासेल
– 462 आयसीयु बेड शिल्लक राहतील
– 647 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल
जिल्ह्याचा मृत्युदर
– पुणे मनपा – 2 टक्के
– पिंपरी चिंचवड – 1.4 टक्के
– पुणे देहू व खडकी कॉनटोन्मेंट बोर्ड – 2.3 टक्के
– पुणे ग्रामीण – 1.9 टक्के
– पुणे जिल्ह्याचा एकूण मृत्यू दर – 1.8
संबंधित बातम्या
राज्यात अंशत: लॉकडाऊन शक्य, ठाकरे सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांचा इशारा, नियमही सांगितले!
बचेंगे तो और भी लढेंगे, मुंबईच्या महापौरांनी मूठ आवळली, लॉकडाऊन की निर्बंध लवकरच घोषणा
(Pune Corona lockdown update : malls, hotel, PMPML bus service closed for seven days, 10th, 12th, MPSC exams will be held at the scheduled time)