पुणे : आपलं हक्काचं आनंदी घर असावं, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. पुण्यासारख्या शहरात आपलं घर असावं, हे तर सगळ्यांचं स्वप्न असतं. तेच स्वप्न आता साकार होणार आहे. कारण म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत (Pune Mhada Lottery) होणार आहे. पु्ण्यासह पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात ही सोडत होणार आहे. 5211 घरांसाठी म्हाडाकडून आज सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमावा उपस्थित राहणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे गृहनिर्माण आणि माहिती क्षेत्र विकास मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
म्हाडा अंतर्गत घर मिळवण्यासाठी 90 हजार 81 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पुणे विभागांतर्गत म्हाडाच्या 5 हजार 211 जणांना घर मिळालं आहे, अशी माहितीनितीन माने-पाटील यांनी दिली आहे. यापैकी 71 हजार 742 अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे. या सोडतीमध्ये पुणे विभागात म्हाडाच्या विविध योजनांतर्गत 279 घरं प्रथम प्राधान्याच्या धर्तीवर 2 हजार 845 घरं आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2 हजार 88 घरे काढण्यात येणार आहेत. म्हाडाने यापूर्वी काढलेल्या घरांच्या सोडतीला अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती पाटील यांनी दिली.
म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत होणार आहे. पु्ण्यासह पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात ही सोडत होणार आहे. 5211 घरांसाठी म्हाडाकडून आज सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमावा उपस्थित राहणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे गृहनिर्माण आणि माहिती क्षेत्र विकास मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांनी ही माहिती दिली आहे. म्हाडा अंतर्गत घर मिळवण्यासाठी 90 हजार 81 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पुणे विभागांतर्गत म्हाडाच्या 5 हजार 211 जणांना घर मिळालं आहे, अशी माहितीनितीन माने-पाटील यांनी दिली आहे. यापैकी 71 हजार 742 अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे.