पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यापीठातर्फे संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे विद्यापीठाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरील परीक्षा नियोजनास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विरोध केला आहे. मनविसेने विद्यापीठानं 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा आयोजित करावी, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनानं केली आहे. (Pune MNS student organization wrote letter to SPPU administration reduce syllabus for semester exam)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं विद्यापीठाच्या निर्णयावर टीका केली आहे. विज्ञान शाखा वगळता इतर अभ्यासक्रम पूर्ण नसतांना 100 % अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची ? असा सवाल मनसेने केला आहे. विद्यापीठानं 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा आयोजित करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत विद्यापीठाचे हे धोरण शिक्षण हित आणि विद्यार्थी हित न जपता हेकेखोर वृत्तीचे फलित असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केलेला आहे. राज्यातील कोरोना प्रादुर्भाव आणि त्यामुळे असणाऱ्या लॉकडाऊनचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर ही मोठ्या प्रमाणात झाला आहे, असं मनविसेनं म्हटलं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसर्या सत्राच्या परीक्षा 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. याबाबतचा विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्याची रूपरेषा परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध केली जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा कोरोनामुळे एप्रिल महिन्यापासून घेण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला.
दहावीच्या परीक्षांबाबत अंतिम निर्णयानंतर कार्यवाही, पालकांमध्ये दोन मतप्रवाह: दिनकर पाटीलhttps://t.co/1BaZGRhyb0#SSC | #SSCexam | #Maharashtra | #DinkarPaitl
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2021
संबंधित बातम्या:
दहावीच्या परीक्षांबाबत अंतिम निर्णयानंतर कार्यवाही, पालकांमध्ये दोन मतप्रवाह: दिनकर पाटील
दहावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या? धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाड यांना निवेदन, वाचा सविस्तर
(Pune MNS student organization wrote letter to SPPU administration reduce syllabus for semester exam)