पुणे : लैंगिक प्रशिक्षणाप्रकरणी मनसे महिला आघाडी आक्रमक झाली आहे. शिबिराच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी मनसे महिला आघाडीने केली आहे. मनसे महिला आघाडीने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांना निवेदन दिलंय. आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे. आयोजकांवर कारवाई न केल्यास मनसे रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वनिता वागस्कर (Vanita Vagskar) यांनी दिला आहे.