पुणे : मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती (Chemical Company Fire). या आगीत होरपळून जवळपास 15 महिलांसह 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण आता या गोडाऊन मधील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केलीये, अशी माहिती आहे (Pune Mulashi Uravade Chemical Company SVS Aqua Technologies Fire Broke Again).
पुण्यातील मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला काल भीषण आग लागली होती. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवून कुलिंगचे काम सुरु होते. पण, आज सकाळपासूनच कंपनीच्या गोडाऊन मधील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केलीये. सध्या येथे अग्निशमन दलाची कोणतीही यंत्रणा घटनास्थळी नाही. रात्री उशिरा कुलिंग झाल्यानंतरही आता पुन्हा आग पेटतीये.
या कंपनीतील आगीत होरपळून तब्बल 18 कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तब्बल 15 महिलां कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर डीएनए टेस्ट केल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. डीएनए टेस्ट पूर्ण होण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर या कर्मचाऱ्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात येईल.
संबंधित घटना ही उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या कंपनीत घडली. सोमवारी (7 जून) दुपारी अडीचच्या सुमारास या कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दुरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. संबंधित कंपनी ही क्लोरिफाईडची असल्याने आग अधिकच भडकली. आगीमागील नेमकं खरं कारण काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.
वॉटर प्युरीफायरसाठी लागणारं क्लोराईड नावाचं केमिकल बनवणारी ही कंपनी होती. आगीनंतरही कंपनीत क्लोरीन, क्लोराईडचे बॉक्स दिसत आहेत. केमिकल कंपनी असल्यामुळे आग जास्त धुमसली. जिल्हाधिकाऱ्यांनी आगीत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, कंपनीच्या मालकांनी आगीत 17 जण गमवल्याची तक्रार केली होती. 18 जणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले आहेत.
आग नेमकी कशी लागली? कशामुळे लागली? या सर्व दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. आगीची दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ एक समिती देखील गठीत केली आहे. लवकरच या कंपनीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कंपनी मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
Pune Fire : सॅनिटायझर कंपनीत 15 महिलांसह 17 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?https://t.co/kUtSe7qj3u#PuneFire #Pune #Fire #MulashiFire #uravade #svsaquatechnologies #chemicalcompany #chemicalcompanyFire
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2021
Pune Mulashi Uravade Chemical Company SVS Aqua Technologies Fire Broke Again
संबंधित बातम्या :
Pune Fire | पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग, 15 ते 20 जण अडकल्याची भीती
Pune Fire : सॅनिटायझर कंपनीत 15 महिलांसह 17 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?
रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची घोषणा