पुणे- शहरातील महापालिकेच्या हद्दीत अनेकांनी अनाधिकृतपणे पणे बांधकामे(Unauthorized construction) केली आहेत. बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या या बांधकामांसाठी गुंठेवारीतील घरे नियमितीकरणाला देण्यात आलेली मुदत संपली. १० जानेवारीला सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेची मुदत 31 मार्चला संपली आहे. मात्र महापालिका प्रशासनाने (Municipal administration)या नियमितेकरणाला पुन्हा मुदत वाढ दिली आहे.आता 30 जूनपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar)यांनी दिली आहे. महापालिकेने या मोहिमेला आतापर्यंत केवळ 77 नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.
महापालिका हद्दीतील गुंठेवारी. त्यानंतर आता त असलेली अनाधिकृत घरे नियमित करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी १० जानेवारी ते 31 मार्चपर्यन्त प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दिली होती ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत फक्त 77 प्रस्ताव दाखल झाले आहेत. बांधकाम नियमावलीतील अटींमुळे छोट्या भुखंडांवर महापालिकेची परवानगी घेउन घरे बांधण्यात अडचणी येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी अनधिकृतपणे ही बांधकामे केली आहेत. यापैकी जी घरे नियमान्वित होऊ शकतात, त्यांचे नियमितीकरण करण्यासाठी राज्य शासनाने गुंठेवारी कायद्यान्वये ती शुल्क आकारून अधिकृत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
नियमितीकरणाची प्रक्रिया किलिष्ट आल्याने अनेक नागरिकांनी याकडे पाठ फिरवली आहे. अनाधिकृत बांधकाम अधिकृत करवून घेत असताना संबंधित नागरिकाला हा प्रस्ताव इंजिनिअरच्या माध्यमातून सादर करावे लागतात. मात्र यासाठी इंजिनिअर भरमसाठ फी आकारत असल्याने नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे आता महापालिकेने गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी आर्कीटेक्ट अथवा इंजिनिअरने 5 हजार रुपये फी आकारावी, असे आवाहन केले आहे.
Shahrukh Khan on Andre Russell: आंद्रे रसेल नामक वादळावर शाहरुख खान खूश, म्हणाला, ‘बऱ्याच दिवसांनी…’
Gudi Padwa | राम कृष्ण हरी ! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फळा फुलांची आरास