विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. काहीच दिवसात आचारसंहिता लागेल आणि निवडणूक प्रक्रिया पार पडेल. अशातच आता महायुतीतील वाद समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. पुण्यातील मावळ विधानसभेच्या जागेवरून वाद सुरु आहे. महायुतीतील या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फूट पडणार असल्याचं बोललं जात आहे. मावळचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. तर याच जागेवर भाजपने देखील दावा केला आहे.
पुण्यातील मावळ तालुक्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून वाद सुरु आहे. महायुतीतून उमेदवारी मिळावी, यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते इच्छुक आहेत. मावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बापूसाहेब भेगडे इच्छुक आहेत. महायुतीमधील घटक पक्ष भाजपने मावळ विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे. मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. मात्र भाजपने दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्येच या जागेबाबत कलगीतुरा रंगू लागला आहे.
मावळ विधानसभेच्या जागेवरती अजित पवार गटातीलच प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी देखील दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मावळ विधानसभेची उमेदवारीची मागणी केली असल्याचं बापूसाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे सध्या मावळ विधानसभेच्या जागेवरती केवळ भाजपच नव्हे तर अजित पवार गटामध्ये देखील चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे.
मावळचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. असं असताना या मतदारसंघावर भाजपने देखील दावा केला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीतच्या जागावाटपात ही जागा कुणाकडे जाणार? अजित पवारांकडे ही जागा आल्यास ते कुणाला उमेदवारी देणार? हे येत्या काळात पाहावं लागणार आहे.