योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही महाविकास आघाडीला धक्के देणाऱ्या घटना घडल्या. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. त्यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रया दिली आहे.
भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असलेला नेता म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच लोकांची रोज चर्चा असते. 100 आमदार असले तरी सुद्धा आमच्याकडेचे लोकं त्यांना हवे आहेत. याचा अर्थ आमच्यात काहीतरी टॅलेंट आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
उन्हाळा वाढत चालला आहे. 8 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने यूपीआय विरोधात व्हाईट पेपर काढले. निशिकांत दुबे यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात आरोप केले की आदर्श घोटाळ्यात काही गोष्टी आहेत. आदर्श घोटाळा अशोक चव्हाण यांनी केला मी नाही बोलत पण हे भाजप बोलते. भाजपचे भ्रष्टाचार जुम्ला पार्टी हे मॉडेल तयार झालं आहे. ज्याच्यावर आरोप करतात दुसऱ्या दिवशी तोच नेता भाजपमध्ये जातो, असं म्हणत महाविकास आघाडीसोडून महायुतीत जाण्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था बद्दल पण मी अनेक वेळा बोलली आहे. मी अमित शाह यांच्याशी सुद्धा सांगितलं आहे. पुणे नागपूर आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे. गृहमंत्रालयाचे हे अपयश आहे. मी राजीनामा मागितला की माझ्यावर टीका केली जाते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे आल्यापासून गुन्हेगारी वाढली आहे. देशाच्या गृहमंत्री अमित शाह यांना विनंती की गृहमंत्रालयाचे ऑडिट करा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.