पुणे | 12 सप्टेंबर 2023 : 2019 ला राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा आल्याचंही बोललं जातं. मात्र त्यावर शिवसेनेच्या महिला नेत्यानं भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लव्ह आणि हेटचं नातं आहे. दोघांच्या बोलण्यात द्वेष आणि त्वेष दिसतो. मात्र देवेंद्र फडणवीसांकडून एवढे अपशब्द ऐकले नाहीत. मात्र उद्धव ठाकरेंचा ठाकरी बाणा आहे. त्यांनी ते कमी करावं. त्या दोघांमध्ये मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत, असं म्हणत शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी या दोघांच्या नात्यावर भाष्य केलं आहे. त्यांनी या दोघांमध्ये प्रेमाचं आणि द्वेषाचंही नातं असल्याचं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या बाजूने एक पिटिशन देण्यात आलं होतं. निरंजन डावखरेंनी निर्णय दिला आहे. विधानपरिषदेतला प्रतोदपदाचा निर्णय अजून झाला नाही. शिंदे गटाकडून विप्लव बजोरिया आणि ठाकरे गटाकडून विलास पोतनीस यांच नावं आहे. मात्र त्या बाबतीत अजून निर्णय झाला नाही.अजित दादांकडून पत्र आलं आहे. गटनेता म्हणून कोणाला नेमावं? विधासभेत असं झालं म्हणून विधानपरिषदेत होईल असं नाही. मात्र आधी विधानसभा काय निर्णय देते, हे पाहावं लागेल, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा पुढे आला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रयत्न करत होते. त्यांचा अपेक्षाचा सन्मान सरकार करेल. विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यात जो ठराव झाला त्याला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न मार्गी लावतील, असंही त्या म्हणाल्या.
कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरही निलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं. न्शन, आर्थिक बोजा, बदल्या काही अधिकारी एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जायला तयार नसतात. मात्र अशावेळी कंत्राटी कामगार उपयोगी येतात. त्राटी सेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे. कंत्राटी कामगारांचं महामंडळ होणं आवश्यक आहे. त्यांच्यासाठी नियमनाची अंमलबजावणी झाली पाहिजे, असंही नीलम गोऱ्हेंनी म्हटलं आहे.