ठाकरे गटाला मोठा धक्का ; संभाजीनगरच्या सभेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी हा बडा नेता भाजपमध्ये…

| Updated on: Apr 03, 2023 | 9:57 PM

पुणे जिल्ह्यातील या ठाकरे गटाच्या नेत्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत पक्ष प्रवेश करणार आहेत.

ठाकरे गटाला मोठा धक्का ; संभाजीनगरच्या सभेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी हा बडा नेता भाजपमध्ये...
Follow us on

पुणे : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकारला पायउतार केले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर अनेक जिल्ह्यातील ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. अजूनही काही नेते शिंदे गटाच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा चालू असतानाच ठाकरे गटातील काही नेते आता भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील नेते पक्षांतर करत आहेत. तर ठाकरे गटातील नेत्यांचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षात प्रवेश होत असल्याने वारंवार ठाकरे गटाला धक्के बसत आहेत.

आताही पुणे जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते भाजपच्या वाट्यावर असल्याने पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटातील नेते भाजपमध्ये जाणार असल्याने त्याचा परिणाम आगामी काळातील निवडणुकांवर होणार असल्याचे बोलले जात आहे.

पुणे जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटातील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक राम गावडे भाजपात प्रवेश करणार आहेत. राम गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे आता पुणे जिल्ह्यात या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

राम गावडे यांच्यासोबत ठाकरे गटाचे तीन तालुकाप्रमुख, दोन माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांसह काही सरपंचही भाजपात प्रवेश करणार असल्याने या पक्षांतराची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

पुणे जिल्ह्यातील या ठाकरे गटाच्या नेत्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत पक्ष प्रवेश करणार आहेत.

राम गावडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपची शिरूर,आंबेगाव तालुक्यात ताकद वाढणार असल्याचेही बोलले जात आहे. ठाकरे गटाचे नेते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.