अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 19 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत उपोषण केलं. मराठा आरक्षणासाठी सुनील कावळे यांनी आत्महत्या केली आहे. यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारची प्रामाणिकता नाही. सध्याचं सरकार सर्वसामान्यांशी खेळ करत आहेत. मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे. ज्यांनी सत्ता भोगली जे सत्तेत आहेत त्यांना चिंता आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. ललित पाटील ड्रग्ज केस प्रकरणावरही प्रकाश आंबेडकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
आरक्षण अशा पद्धतीने मिळणार नाही. सुप्रीम कोर्ट काय म्हणत हे महत्वाचं आहे. कोर्ट डेटा आणा असं म्हणतंय. डेटा नाही म्हणून नाही असं कोर्ट म्हणतंय. एक विंडो ओपन आहे. मात्र त्या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. मराठा समाजातील भांडण हे ऐतिहासिक आहे. एकमेकांच्यात भांडण आहेत. रयतेला मराठा जोपर्यंत येत नाही तोवर आरक्षण अवघड आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
पोटबंदरमध्ये 20 हजार कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं आहे. त्याचा तपास कुठे कसा सुरू आहे? हे माहिती नाही. सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सायकलमध्ये बॉम्बस्फोट झाला. त्या प्रकरणातील सायकलवाला गायब आहे. तसंच हेदेखील सुरू आहे. पोलीस खात्याने आणि ललित पाटीलने यावर बोलावंय जोपर्यंत तो सांगत नाही तोवर आपण बोलून उपयोग नाही, असं आंबेडकर म्हणालेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशात शिवसेना आणि वंचितची आघाडी झालेली आहे. यावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. जागावाटपावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आणि आमचं जागा वाटप झालं आहे, असं मी मानतो. बाकी त्रिकूट बाबत त्यांनी निर्णय घ्यावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
माझी एक महत्वाची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू होती. ती 6 नोव्हेंबरला गेली. म्हणून आज आलो. आज दिवसभर सुरू राहणार आहे. कमिशन समोर आज असणार आहे. रवींद्र शेणगावकर यांनी म्हटलं की फंडिंग आलं आहे. ते बेकायदेशीर आहे. खर्च झाला सगळा पैसा आम्ही हिशोब दिलं आहे. मोघम सगळं त्यांनी दिलं आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.