अभिजित पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 07 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात जागावाटपाबाबत सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. सर्व गोष्टी जाहीर झाल्या नाहीत. अंतिम निर्णय लवकर येईल. आताची राजकीय परिस्थिती बदलली आहे भाष्य करता येणार नाही. आमच्या सोबत अनेक घटक पक्ष आहेत. अनेक पक्ष येतील लवकरच निर्णय जाहित होईल. पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतील. कुणाचं तिकीट कापलं जाईल आशा अफवा पसवू नये. या सगळ्या अनौपचारिक गोष्टी आणि गप्पा आहेत. जरा धीर धरा सगळं कळेल, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
9 मार्च रोजी मुंबईत पक्षाच्या शिवसेना महिला सेनेच्या वतीने शिवदुर्ग महिला संमेलन कार्यक्रम घेणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. अनेक महिला मेळावे आम्ही राज्यभर घेणार आहोत. राज्याचं चौथं महिला धोरण लवकरच जाहीर होईल. कदाचित ते उद्या देखील महिला दिनाच्या दिवशी होऊ शकतं. कायद्यात अनेक बदल होतील. निवडणुकीत देखील महिला मतदाराचा मोठा हातभार आहे. सभागृहात आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. अधिवेशनात चांगले काम झाले आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
सगळे कार्यकर्ते आपल्या पक्षाला बांधील आहेत. म्हणून त्यांना वेठ बिगारा सारख वागवायचं अस चालणार नाही. अनेक नेत्यानी पक्ष सोडले आहेत. पवार साहेबांनी देखील अनेक वेळा पक्ष फोडले आहेत. लोक ज्यांच्या बाजूने पक्ष त्यांचा… कार्यकर्त्याना गृहीत धरण बंद करा. Evm चा विषय आता निकाली ज्यांनी तक्रार केले तेच निवडून आले, असं म्हणत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं.
कथित आदर्श घोटाळ्यावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला. त्यावरही नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं. आदर्श घोटाळ्याची सुनावणी सुरू आहे. लोक कोर्टात जाऊ शकतात. विरोधी पक्ष म्हणून आरोप केले जातात. पण यात विरोधी पक्षणे पुरावे दिले पाहिजेत. निराधार आरोप करणं, याबाबत पुरावे देणं गरजेचं आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.