Pune Omicron update : पुणे पिंपरीत ओमिक्रॉनचे 7 रुग्ण, महापालिका ॲक्शन मोडवर, कोविड सेंटर्सबद्दल मोठा निर्णय

| Updated on: Dec 06, 2021 | 6:56 AM

ओमिक्रॉनचा संसर्ग सुरू होताचं पुणे महापालिका पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं सीओईपीच्या मैदानावरील जम्बो रुग्णालयाची पाहणी केली.

Pune Omicron update : पुणे पिंपरीत ओमिक्रॉनचे 7 रुग्ण, महापालिका ॲक्शन मोडवर, कोविड सेंटर्सबद्दल मोठा निर्णय
OMICRON
Follow us on

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) सहा तर पुण्यात (Pune) एकाला ओमिक्रॉनची (Omicron) लागण झाल्याचं रविवारी सायंकाळी स्पष्ट झालं. राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची (Maharashtra Omicron Update) संख्या 8 झाली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग सुरू होताचं पुणे महापालिका पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं सीओईपीच्या मैदानावरील जम्बो रुग्णालयाची पाहणी करत रुग्णालय कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुण्यातील जम्बो रुग्णालय सुरु राहाणार

जम्बो रुग्णालय 1 जानेवारीपर्यंत न हलवण्याच्या सूचना अजित पवारांनी बैठकीत दिल्या होत्या. महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. पवार यांनी काल पाहणी करून रुग्णालय रेडी पझेशनमध्ये ठेवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. जम्बो रुग्णालयात एकुण 800 बेडची व्यवस्था आहे…

बंद कोविड सेंटर्स पुन्हा सुरु करण्याची तयारी

पुणे महापालिकेची बंद असलेली कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करण्याची महापालिकेची तयारी आहे. मात्र, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनसाठी कोविड सेंटरमध्ये राहायचं नसेल महापालिका हॉटेलची सूविधा करणार आहे. मात्र, हॉटेलचा खर्च प्रवाशाला करावा लागणार आहे. दुसऱ्या लाटेतही महापालिकेनं अशी व्यवस्था केली होती.

हडपसर, येरवड्यातील कोविड सेंटर सुरु करण्याची तयारी

सध्या नायडू हॉस्पिटल आणि बाणेर कोविड सेंटर अशी दोनचं सेंटर सुरू आहेत..मात्र हडपसर ,येरवड्यातील कोविड सेंटर सुरू करण्याची पालिकेची तयारी आहे.

नायजेरियातून आलेल्या 6 जणांना संसर्ग

पिंपरी-चिंचवडमध्ये सापडलेले सहाही जण नायजेरियातून आले होते. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी एक 44 वर्षाची महिला आली होती. तिच्या सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा तिचा भाऊ, ती आणि तिच्या दोन्ही मुलींसह एकूण सहा जणांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. पुण्यातील एका 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमिक्रॉनची लागण झाली आहे.

इतर बातम्या:

Omicron News Live Updates : कर्नाटक, गुजरात महाराष्ट्रानंतर राजस्थानमध्ये ओमिक्रॉनचा प्रवेश, दिल्लीत महत्त्वाची बैठक

Omicron Update |पुण्यात ओमिक्रॉनचा शिरकाव : जिल्ह्यासह ,पालिका प्रशासन अर्लट ; परदेशातून परतलेल्या 267 नागरिकांची RT-PCR निगेटिव्ह

Pune Omicron Update PMC alert after Omicron Patient found in city civic body officers taken review of Jumbo Covid centers