पुण्यातील ‘या’ गणपती मंडळांवर होणार कारवाई, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

| Updated on: Sep 18, 2024 | 5:27 PM

पुण्यातील गणपती मिरवणुका 28 तासांनंतर संपल्या. या मिरवणुकांमधील काही मंडळांवर कारवाई होणार आहे. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली. नेमकी ही कारवाई कोणत्या मंडळांवर आणि कशामुळे होणार आहे ते जाणून घ्या.

पुण्यातील या गणपती मंडळांवर होणार कारवाई, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती
Follow us on

देशासह राज्यभरातील गणेश भक्तांनी लाडक्या गणपती बाप्पाला जड अंत:करणाने निरोप दिला. पुण्यातील विसर्जन मिरवणुका कोणत्याही विघ्नाविना शांततेत पार पडल्या. मंगळवारी सुरू झालेल्या मिरवणुका आज दुपारी तीन वाजता संपल्या आहेत. पुणे पोलिसांकडून मिरवणूक संपल्या असं जाहीर करण्यात आलं आहे. तब्बल 28 तास पुण्यातील विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. पुणे पोलीस आयुक्तांनी मिरवणुका संपल्यावर बोलताना काही मंडळांवर कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे. नेमकी कोणती मंडळे आहेत आणि त्यांच्यावर का कारवाई होणार जाणून घ्या.

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका 28 तास मिरवणूक सुरू होत्या. पुण्यामध्ये 8 हजार अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात तैनात होते. शांततेत गणेशोत्सव पार पडला त्याबद्दल सर्व मंडळ आणि भक्तांना धन्यवाद. यंदाच्या वर्षी मिरणुकांमध्ये लेजरवर पूर्ण पणे बंदी होती. त्यासोबतच आवज मर्यादे संदर्भात देखील डेसीबील मोजण्याच्या मशीन होत्या. ज्या ठिकाणा या नियमांचे उल्लंघन केले गेले त्या ठिकाणी कारवाई करणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.

मोबाईल चोरी घटना घडल्या आहेत कमी घडल्या त्या सर्व बाबत कारवाई करून चोऱ्या उघडकीस आणू ,महिला सुरक्षा बाबत काम केलं त्यात काही घटना घडल्या असतील तर त्यावर ही कारवाई करणार असल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलं.

मागील काही वर्षांत मिरवणुकीसाठी लागलेला वेळ

2016 : 28 तास 30 मिनिट
2017 : 28 तास 05 मिनिट
2018 : 27 तास 15 मिनिट
2019 : 24 तास
2020 आणि 2021 : कोविड महामारीमुळे मिरवणूक निघाली नाही
2022 : 31 तास
2023 : 28 तास 40 मि.

पुण्यातील प्रमुख चार रस्त्यांवरून या मिरवणुका निघाल्या होत्या.मानाच्या गणपतीसह इतर मंडळ या मिरवणुकीत सहभागी झाले होते. अखेर मिरवणूक संपल्यानंतर आता अलका चौकामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. गेले 28 तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. काही वेळात मनपाच्या स्वच्छता विभागाकडून या ठिकाणी स्वच्छता राबवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.