अग्रवाल कुटुंबाचा अंडरर्वल्डशी संबंध आहे का?; पुणे पोलीस आयुक्तांची अत्यंत महत्वाची माहिती

| Updated on: May 22, 2024 | 2:21 PM

Pune Police Commissioner Amitesh Kumar Vishal Agrawal Relation With Underworld : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावर भाष्य केलं आहे. अग्रवाल कुटुंबाचा अंडरर्वल्डशी संबंध आहे का? यावर त्यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

अग्रवाल कुटुंबाचा अंडरर्वल्डशी संबंध आहे का?; पुणे पोलीस आयुक्तांची अत्यंत महत्वाची माहिती
Follow us on

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरण सध्या वेगवेगळी वळणं घेतंय. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. अग्रवाल कुटुंबाचे खरंच अंडरवर्ल्डशी संबंध होते का? यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भाष्य केलं आहे. अग्रवाल कुटुंबाचा अंडरर्वल्डशी संबंध आहे का यासंदर्भात माहिती मागविण्यात आली आहे. विशाल अग्रवालचा अंडरवर्षी संबंध आहे का याबाबत ही चौकशी केली जाणार आहे.गाडीच्या रजिस्ट्रेशन संदर्भात आरटीओकडून माहिती मागविण्यात आली आहे, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.

अपघातातील अल्पवयीन आरोपीला अडल्ट म्हणून घोषित करण्याची विनंती आम्ही कोर्टाकडे केली आहे. शिवाय आरोपीला रिमांड होम मध्ये दाखल करावं अशी ही विनंती करण्यात आली आहे. कोर्टाने अडल्ट म्हणून घोषित केल्यावर पुणे पोलीस आरोपीची तात्काळ कस्टडी घेणार आहे, अशी माहिती देखील अमितेश कुमार यांनी दिली आहे.

अग्रवाल कुटुंब अन् छोटा राजन

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचा भावासोबत संपत्तीसंदर्भात वाद झाला. यावेळी सुरेंद्र अग्रवाल यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली होती. त्यावेळी छोटा राजनच्या गुंडांनी गोळीबारही केला होता. यावेळी एफआयआर देखील दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

अपघात प्रकरणातील अपडेट

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याची पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी होणार आहे. चौकशी करून कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. पोलीस आयुक्तालयात चौकशी सुरु झाली आहे. चौकशी करून किती दिवसाची पोलीस कोठडी मागायची याचा निर्णय पोलीस घेणार आहेत. वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत. दोन ते अडीचच्या दरम्यान कोर्टात हजर करणार आहेत.

पुणे पोलिसांकडे अजूनही कुठलही रिपोर्ट नाही. कोर्टाकडून कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टची मागणी करण्यात आली आहे. पुरवा म्हणून ब्लड रिपोर्ट द्या. पोलिसांकडून मात्र बार आणि पबचं 48 हजार रुपयांचं बिल आणि सीसीटीव्ही कोर्टात सादर करण्यात आलं आहे.