Pune crime | राष्ट्रपती पदकासाठी सरकारची फसवणूक, पुण्यातील पोलिसाचा प्रताप , पोलीस दलात खळबळ

| Updated on: Mar 11, 2022 | 1:04 PM

पोलीस प्रशासनाने दिलेली शिक्षाही राष्ट्रपती पदक मिळण्यास अडसर ठरत होती. हा अडसर दार करण्यासाठी जगताप यांनी पोलीस दलातील कनिष्ठ श्रेणी लिपिक नितेश आयनूर तसेच वरिष्ठ श्रेणी लिपिक रवींद्र बांदल यांच्या मदतीने गुन्हेगारी कट करुन सेवा पुस्तकातील नोंदीचे बनावटीकरण केले.

Pune crime | राष्ट्रपती पदकासाठी सरकारची फसवणूक, पुण्यातील पोलिसाचा प्रताप , पोलीस दलात खळबळ
pune-police
Follow us on

पुणे – पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक (Presidential Medal)या पुरस्काराने गौरवले ज़ाते. मात्र सर्वोत्कृष्ट पदकासाठी पुणे पोलीस (Pune Police) दलातील कर्मचाऱ्यांनी सरकारची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत ही फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिस दलातील गणेश जगतापसह 2 लिपिकांवर वानवडी (Wanwadi ) पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप (नेमणूक विशेष शाखा, पुणे शहर), नितेश अरविंद आयनूर ( पोलीस उपायुक्त कार्यालय गोपनीय शाखेतील कनिष्ठ लिपिक), रवींद्र धोंडीबा बांदल (वरिष्ठ लिपिक) आणि गणेश जगतापच्या अज्ञात सहकाऱ्याविरोधात भादवी 409, 420, 467, 468, 475, 476, 474, 472, 471, 466, 167 व 120 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ लिपिक संतोष प्रतापराव भोसले यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. संबंधित प्रकार 2017 ते 2020 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला आहे.

नेमक काय घडलं

याबाबत मिळालेल्या माहितीनुसा आरोपी हवालदार गणेश जगताप हे 2017  ते 2020 या कालावधीत वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांचा कामातील हलगर्जीपणा, चुकारपणा यामुळे डिपार्टमेंट अंतर्गत कारवाई करत 2 वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली होती. मात्र डिपार्टमेनेट दिलेली शिक्षाही राष्ट्रपती पदक मिळण्यास अडसर ठरत होती. हा अडसर दार करण्यासाठी जगताप यांनी पोलीस दलातील कनिष्ठ श्रेणी लिपिक नितेश आयनूर तसेच वरिष्ठ श्रेणी लिपिक रवींद्र बांदल यांच्या मदतीने गुन्हेगारी कट करुन सेवा पुस्तकातील नोंदीचे बनावटीकरण केले. त्याच्या आधारे खोटा दस्त तयार केला . त्यावर खोट्या सह्या केल्या. तसेच शिक्के मारत वेतनवाढीची झालेल्या कारवाईचे रेकॉर्ड नष्ट करून टाकले. नष्ट केलेल्या पुराव्यांचा फायदा राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी फायदा घेतला आहे.

फसवणूक करण्यास सहकाऱ्यांनी केली मदत

जगताप यांना याप्रकारे फसवणूक कारण्यास सहकाऱ्यांनाही मदत केल्याचे समोर आले आहे. जगताप यांना झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वानवडी पोलीस ठाण्यात नेमणूकीला असलेले डे बुक अंमलदारांची होती. त्यांनी या शिक्षेची अंमलबजावणी न करता जगताप याला मदत केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपती पदकासाठी आपली कामगिरी योग्य आहे, असे वाटल्यास प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वरिष्ठांकडे अर्ज करु शकतो. अर्ज करत असताना आपल्याला कोणतीही शिक्षा झालेली नाही अथवा चौकशी प्रलंबित याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. जगताप याने राष्ट्रपती पदकासाठी अर्ज केला होता. त्याची चौकशी करत असताना त्याच्या सेवा पुस्तकात दुसरे पान जोडलेले आढळून आले.

शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी दयनीय होणार, आठवलेंचे भविष्य; लोकसभेला 3 जागा तरी येतील की नाही!

देशाच्या 28 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात, राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात आणखी काय?; वाचा सविस्तर

IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?