कोरोना कमी झालेला असला तरी गणेशोत्सवात शहरात (Pune Ganeshotsav) होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी जवळपास 39 नियम आणि अटी घातल्या आहेत. त्याचे पालन करावे लागणार आहे.
श्रीगणेश
Image Credit source: Dagdusheth Ganpati
Follow us on
पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांकडून (Pune city police) आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. गणेश मंडळांसाठी 39 नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. यंदाचे सण उत्सव उत्साहात आणि सार्वजनिक स्वरुपात साजरे करणार असल्याचे मागेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. दोन वर्ष कोरोनाच्या सावटात सर्वच सण-उत्सव केवळ घरात करावे लागले. यंदा मात्र कोरोनाचे (Covid) प्रमाण कमी झाल्यामुळे सण उत्सवांचे वेध सर्वांनाच लागले आहेत. कोणत्याही निर्बंधांशिवाय यंदा उत्सव साजरा होत असल्याने सर्वांमध्येच आनंदाचे वातावरण आहे. कोरोना कमी झालेला असला तरी गणेशोत्सवात शहरात (Pune Ganeshotsav) होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी जवळपास 39 नियम आणि अटी घातल्या आहेत. त्याचे पालन करावे लागणार आहे. निर्बंध जरी नसले तरी नागरिकांनीही योग्य ती आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांनी मंडळांसाठी जारी केलेले नियम आणि अटी
श्रींची मूर्ती स्थापना तसेच आरास संदर्भात गणेश मंडळाने आपल्या मंडळाची नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे करणे आवश्यक
श्री गणेशाच्या स्थापनेपूर्वीच सर्व मंडळांनी पोलीस परवाना घेणे बंधनकारक
सक्तीने अगर वाहने अडवून वर्गणी जमा करू नये.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गणपती मंडप रस्त्याचा 1/3 भाग उपयोगात आणून बांधावा