कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला आज कोर्टात हजर केलं गेलं आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणी आज सुनावणी होत आहे. अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि बार चालक जितेश शेवनी, जयेश बोनकर हे तीनही आरोपी आज कोर्टात हजर आहेत. मात्र विशाल अग्रवाल कोर्टात पोहोचताच त्याच्यावर शाई फेकीचा प्रयत्न करण्याच प्रयत्न केला गेला. विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवरती ही शाई फेकण्यात आली आहे. पुण्यातील वंदे मातरम संघटनेने ही शाई फेक केली.वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कोर्टात सुनाावणीला सुरुवात झालीय. पोलिसांनी आपली बाजू मांडली. पब मध्ये यांनी काय चौकशी केली. वडिलांनी पार्टी ला परवानगी दिली. परवाना नसताना गाडी चालवायला दिली आहे. जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा ते पुण्यात होते. मात्र बाहेर आहे अस सांगितल आणि फरार झाले. ते संभाजीनगर ला आढळून आले. गाडीचा कोणताही परवाना नव्हता, असं पोलिसांनी या वेळी कोर्टात म्हटलं.
मुलाला संपत्ती देताना कशी दिली होती याची चौकशी करायची आहे. मुलगा घरातून किती वाजता निघाला याची चौकशी करायची आहे. ताब्यात घेतला तेव्हा छोटा मोबाईल आढळून आला दुसरे फोन लपवले आहेत. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे. त्या मोबाईलचा तपास करुन तो जप्त करायचा आहे. त्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यक आहे. हा सगळा तपास पोलीस कोठडीत करता येणार आहे ७ दिवसाची पोलीस कोठडी द्या. पोलिसांना तपासात सहकार्य केलं नाही, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
41 ची नोटीस आम्हाला दिली नाही. आम्ही फरार नव्हतो. अटक झाली तेव्हा तरी नोटीस द्यायला हवी होती, असं आरोपीच्या वकीलांनी म्हटलं. आम्ही यांना नोटीस देण्यासाठी शोध घेणायचं प्रयत्न केला, असं पोलिसांनी म्हटलं. दरम्यान, कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि बार चालक जितेश शेवनी, जयेश बोनकर या तिघांना कोर्टाने 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे.