अपघातावेळी वेदांतने ड्रिंक केली होती का? गाडी कोण चालवत होतं?; प्रत्यक्षदर्शीकडून मोठा खुलासा

| Updated on: May 28, 2024 | 8:04 PM

Pune Porsche Accident Case Eyewitness Amin Shaikh on Vedant Agrawal : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघात प्रकरणातील मोठे खुलासे आता समोर आले आहेत. अपघातावेळी तिथे उपस्थित असणारे रिक्षाचालक आमिन शेख यांनी काय म्हटलं? काय खुलासे केले? वाचा सविस्तर...

अपघातावेळी वेदांतने ड्रिंक केली होती का? गाडी कोण चालवत होतं?; प्रत्यक्षदर्शीकडून मोठा खुलासा
Follow us on

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. हा अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असणारे, प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालक आमिन शेख यांनी टीव्ही 9 मराठीवर एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया दिली. अपघातावेळी नेमकं काय घडलं? हे आमिन शेख यांनी सांगितलं. अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. शनिवारची रात्र असल्यामुळे पार्टी करून पबमधून मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडत असतात. त्यामुळे मला तिथं भाडं मिळेल यासाठी थांबलो होतो. पण इतक्यात भीषण अपघात झाला, असं आमिन शेख यांनी म्हटलं.

ड्रिंक केली होती का?

गाडीतील मुलांनी ड्रिंक केलेली होती. त्यांना नीट उभं देखील राहता येत नव्हतं. लोक जेव्हा त्यांना मारत होते. तेव्हा त्यांना नीट उभं देखील राहता येत नव्हतं. त्यांना लोक मारत होते. पण त्यांना मार लागत देखील नव्हता. ते एवढंच म्हणत होते की, आम्हाला मारू नका. जेवढे पैसे हवे आहेत. तेवढे आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत पण आम्हाला मारू नका असं ती मुलं म्हणत होती, असं आमिन शेख यांनी सांगितलं.

गाडी कोण चालवत होतं?

अपघात झाल्यानंतर दोन मिनिटांनी मी त्या ठिकाणी पोहोचलो. गाडीत एकूण तीन मुलं होती. गाडीत दोन मुलं पुढं बसलेली होती. आम्ही पोहोचेपर्यंत एक मुलगा पळून गेला होता. पण गाडी कोण चालवत होतं ते मी पाहिलं नाही, असं आमिन शेख यांनी सांगितलं.

पोर्शे कार अपघात प्रकरणातील वेगवेगळे कंगोरे समोर येत आहेत. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ससून रुग्णालय चौकशी समिती गेल्या 7 तासांपासून कामकाज करत आहे. ससून रुग्णालय डिन डॉ. विनायक काळे यांच्या केबिनमध्ये समितीचं कामकाज सुरू आहे. समितीकडून ससून रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ब्लड लॅबच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यासह इतर दोन सदस्यांनी चौकशी केली आहे. या समितीने ब्लड लॅबची पाहणी केली आहे.