पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ व्यक्तींची पोलीस आयुक्तालयात चौकशी

| Updated on: May 28, 2024 | 5:41 PM

Pune Porsche Accident Case Latest Update : पोर्शे अपघात प्रकरणात रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस आयुक्तालयात या प्रकरणी चोकशी केली जात आहे. कोणाची होतेय पोलीस आयुक्तालयात चौकशी होत आहे? वाचा सविस्तर...

पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; त्या व्यक्तींची पोलीस आयुक्तालयात चौकशी
Follow us on

पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आता या प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे. ससून हॉस्पिटलमधील शिपाई अतुल घटकांबळे याला पोलिस आयुक्तालयात आणलं आहे. अतुल घटकांबळेने डॉ. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यातील संवादाचं काम केल्याचा आरोप आहे. त्याची पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चौकशी केली जात आहे. तर डॉ. श्रीहरी हळनोरला देखील चौकशीसाठी पोलीस आयुक्तालयात आणलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

घटकांबळेची कसून चौकशी

अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी लागणारा मोबदला किती? आणि तो कसा द्यायचा? हे घटकांबळेने या दोघांशी बोलवून ठरवलं होतं. याच प्रकरणात घटकांबळेची आज चौकशी केली जातीये. या चौकशीत आणखी कोणी घटकांबळेशी संवाद साधला का? त्यासोबतच डॉ. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त आणखी तिसऱ्या व्यक्तीचा या प्रकरणात संबंध आहे का? हे तपासण्यासाठी पुणे गुन्हे शाखेकडून आज घटकांबळेची कसून चौकशी केली जात आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाखो रुपये घेवून ब्लड रिपोर्ट बदल्याचा आरोप डॉ. श्रीहरी हळनोरवर आहे. श्रीहरी हळनोरला पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आता ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे यांची अन् श्रीहरी हळनोर याची चौकशी पुणे पोलिसांकडून केली जात आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात ही चौकशी केली जात आहे.

पोलीस कोठडी मिळाल्यानंतर सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं आहे. गुन्हे शाखेकडून आता दोघांची समोरासमोर चौकशी केली जात आहे. हिट अँड रन प्रकरणात चालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल आहेत.

वडेट्टीवार काय म्हणाले?

पोर्शे अपघात प्रकरणावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या SIT च्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्या चौकशीवर जनतेचा विश्वास नाही. या पूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे ही महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.