पब, बारचे होणार लाईव्ह स्ट्रीमिंग? खडान् खडा मिळणार माहिती, पुणे उत्पादन शुल्क विभागाचा काय आहे प्लॅन तरी

| Updated on: May 26, 2024 | 4:50 PM

Pune Porsche Car Accident Case : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्श कारने दोन तरुण अभियंत्यांना चिरडले. त्यानंतर देशभरात एकच संतापाची लाट उसळली. सर्वच यंत्रणा कामाला लागली. आता पुण्यातील उत्पादन शुल्क कार्यालय पण मोठं पाऊल टाकण्याच्या विचारात आहे.

पब, बारचे होणार लाईव्ह स्ट्रीमिंग? खडान् खडा मिळणार माहिती, पुणे उत्पादन शुल्क विभागाचा काय आहे प्लॅन तरी
आता तिसऱ्या डोळ्याची पाळत
Follow us on

पुण्यात भरधाव पोर्श कारने दोघांना चिरडले होते. कल्याणीनगरमध्ये हा प्रकार घडला होता. अगोदर आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ज्यावेळी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आणि कारवाईचे रिपोर्ट समोर आले. तेव्हा संतापाची लाट उसळली. प्रकरण आपल्यावर शेकू नये म्हणून सर्वच यंत्रणा कामाला लागल्या. आता याप्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. अनके अपडेटसमोर येत आहेत. त्यातच पुण्यातील उत्पादन शुक्ल कार्यालय पण एक मोठं पाऊल टाकण्याच्या विचारात आहे.

71 पब-बारवर कारवाईचा बडगा

कल्याणीनगरमध्ये बेकदारपणे वाहन चालवून दोघांचा बळी घेणारा अल्पवयीन आरोपी अपघातापूर्वी एका बारमध्ये असल्याचे समोर आले. नशेच्या अंमलात त्याने कार चालवून हे कृत्य केल्याचे समोर आले. त्यानंतर सर्वच यंत्रणा खडबडून जागी झाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने पण कारवाईचा बडगा उगारला. 14 पथके स्थापन करण्यात आली. तीन ते चार दिवसांत धडक मोहिम राबविण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील 71 पब-बारवर कारवाई करण्यात आली. गुन्हे दाखल करण्यात आले. बार-पब सील करुन बंद करण्यात आले. या कारवाईमध्ये 1 कोटी 12 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

या कारणांमुळे केली कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज तीन मोठ्या बार, रेस्टॉरंटवर कारवाई केली. त्यांनी अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले. रात्री मध्यरात्रीपर्यंत ते उघडे असल्याचे समोर आले. तर परवाना नसताना मद्य दिल्याचे समोर आले आहे. तर यातील अनेक रेस्टॉरंट, पब, बारने अल्पवयीन ग्राहकांना पण मद्य विक्री केल्याचे समोर आले.

लाईव्ह स्ट्रीमिंगचा पर्याय

पब आणि रेस्टॉरंटमध्ये वेबकास्टिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा आमचा विचार आहे. ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून तिथली अद्ययावत माहिती आम्हाला मिळेल. कंट्रोल रुममधून अधिक प्रभावीपणे तिथे लक्ष ठेवता येईल. आमच्या अख्त्यारीत 2000 बार आहेत. त्यामुळेत त्यांच्यावर लक्ष ठेवणे जिकरीचे होते, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्ट केले.