पुण्यात एका अल्पवयीन मस्तवाल तरुण मित्रांसोबत दारुची पार्टी करतो. मद्याच्या अंमलाखाली बेदरकारपणे आलिशान कार चालवतो. रस्त्यावरील बाईकला जोरात ठोकरतो. त्यात दोन तरुण अभियंत्याचा प्राण जातो. पण अवघ्या 15 तासांत त्याला उपदेशाचे डोस देऊन सोडण्यात येत असेल, तर पोलिसांच्या या कारवाईवर संशय उपस्थित होते, प्रश्नांची सरबत्ती झाली तर चुकले काय? या अल्पवयीन तरुणाला लागलीच जामीन मिळाल्याने नवीन वाहन कायदा पण प्रश्नांच्या फेऱ्यात आला आहे. आरोपी ताब्यात असताना त्याला पोलिसांनी त्याला खास पाहुण्यासारखी वागणूक दिली. त्याला पिझ्झा-बर्गर आणून दिला. मग सोशल मीडियावर पोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे निघणार नाही तर काय होईल?
श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा
आरोपीला मदत तरी कुणाची?
आरोपी नाबालिक आहे म्हणून काय झाले, त्यामुळे दोन जीव गेले, त्याचे काय, असा सवाल पीडित कुटुंब विचारत आहे. रविवार असताना कोणते न्यायालय उघडे असते, हा महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला आहे. या घटनेनंतर पुण्यातील एका पबमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्याठिकाणी आरोपी दारुची पार्टी करताना दिसत आहे. पण पोलिसांचा सुरुवातीचा अहवाल मात्र तो दारु पिला नसल्याचे सांगत नामनिराळा झाला. कायदा वाकवला तसा वाकतो, हे तर या प्रकरणाने देशाला दाखवून दिले नाही ना? पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे. मग पोलिस आरोपीला व्हीआयपी वागणूक का देत आहे? पिझ्झा-बर्गरसाठी धावा-धाव का करत आहे. या ठिकाणी श्रीमंताचा दिवटा नसता तर पोलिसांनी अशी सरबराई केली असती का? असे अनेक सवाल समोर आले आहे.
सोशल मीडियावर पुणे पोलिसांवर प्रहार
सोशल मीडियावर पुणे पोलिसांच्या एकूणच कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. तर बाल न्याय मंडळाने दिलेला आदेश पण ट्रोल होत आहे. कार अपघातात एखाद्याचा बळी घेतला आणि निबंध लिहिला तर शिक्षा पूर्ण होते का? असा सवाल सोशल मीडियावर विचारल्या जात आहे. X वर काहींनी केवळ निंबध लिहिला तर वाहन परवाना मिळतो का? असा उपरोधिक टोला हाणला आहे.अर्थात या सर्व प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पुणे पोलिस आयुक्तांनी त्यांची भूमिका मांडली आहे.