पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहे. पोलिस चौकशीत आणि विशेष समितीच्या चौकशीनंतर अजून एक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. डॉ. अजय तावरेच्या कारनाम्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. डॉ. तावरे यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी इशारा दिला आहे.
शेरा मारला, पण नंतर पदमुक्त केले
आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉक्टर सुनील तावरे याला अधीक्षकपदी नियुक्ती देण्याविषयीच्या पत्रावर शेरा मारला होता. आमदार सुनील टिंगरे यांनी 26 डिसेंबर 2023 रोजी हे शिफारस पत्र त्यांना पाठवले होते. मात्र ससून रुग्णालायत उंदीर चावून एकाचा मृत्यू झाला. त्यावेळी समिती नेमली होती.त्यावर डॉ. तावरे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यात तावरेला पदमुक्त केल्याचे मुश्रीफ म्हणाले.
पदावर नसताना तावरेचा कारनामा
तावरे अधीक्षक नव्हते. तरीही पुणे पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा रक्त नमुना बदलण्याचे काम झाले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तावरेसह इतर दोघांना अटक करण्यात आलेली आहे. तावरेने दबाव टाकून केलेली कृत्ये पोलीस तपासात समोर आली आहे. अक्षम्य चूक आहे, त्यांना जीवनाची अद्दल घडवणार पुन्हा अशी चूक कोणाकडून होणार नाही अशी कारवाई डॉ. तावरे यांच्यांवर होईल, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.
समितीच्या अहवालत विनायक काळे (डीन) यांचा देखील निष्काळाची पणा आहे, डॉ. काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. पैशाच्या लालसेपोटी डॉ. तावरे यांनी हा कारनामा केला हे चुकीचे आहे. बाहेरचा हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेतली जाईल. उपमुख्यमंत्री अजितदादा असे प्रकार खपवून घेणार नाहीत, दोषींवर कारवाई करतील.कितीही मोठा असला तरी कारवाई केली जाईल, असे मुश्रीफांनी स्पष्ट केले.
जितेंद्र आव्हाड यांना अद्दल घडवा
मनुस्मृतीचे दहन करायचे होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यावर फोटो छापण्याची गरज काय? असा सवाल मुश्रीफ यांनी विचारला. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जनतेचा अपमान केला आहे. केवळ माफी मागून होणार नाही.जितेंद्र आव्हाड यांना अद्दल घडवण्याची गरज असल्याचे मुश्रीफ म्हणाले.