अमोल कोल्हेंना निवडणुकीला उभं रहाण्याची इच्छा नव्हती. कंटाळलो आहे. वेळ मिळत नाही. जबाबदारी सांभाळता येत नाही, असं मत कोल्हेंनी अनेक वेळा बोलून दाखवलं. देशात भाजपाचा प्रभाव नरेंद्र मोदीकडे आहे. मग आपण सर्वांनी भाजपासोबत जायला पाहिजे, असं अमोल कोल्हेंचे मत होते. त्यामुळे अजित पवारांसह अनेक मंत्र्यांच्या शपथविधीला अमोल कोल्हे उपस्थित राहिले. जे आहे ते खरं सांगितले वेगळं काही सांगितले नाही, असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
अमोल कोल्हे संसदेत भाषण करुन व्हायरल केलं. एवढ्यापुर्ती संसदेची हजेरी नसते. संसदेचे अधिवेशन काळात मतदार संघातील कामे करुन घ्यायची असतात. त्यामुळे मला माहिती आहे शिरुरला काय काम केलं? संसदेबरोबर पक्षाच्या कमिटी बैठकीला पण गैरहजरी असते. 33 वर्ष मी खासदार आहे. संसदरत्न हा विकास किंवा लोकांची सेवा केल्याचे प्रमाणपत्र नाही. प्रश्न विचारुन जर देशाचे प्रश्न सुटत असतील. तर अशा बोलक्या लोकांमध्ये कृत्य मात्र शुन्य असतं, अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.
मुंबईत मराठी लोकांना नोकरी मिळत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावरही प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं. लोकांची दिशाभूल करण्यासाठी निवडणुकांमध्ये असं होत आहे. राज्यातला उद्योग दुस-या राज्यात जात असल्याचाही अपप्रचार होतोय असं काही खरं नाही. राज्यात उद्योग क्षेत्रात नवीन गुंतवणूकीत महाराष्ट्र एक नंबरला आहे. त्यासाठी समतोल विकास व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न करु, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
२६ /११ काय झालं, हे वडेट्टीवारांना काय महिती आहे. पोलीसांनी केलेली कामगिरी आणि त्यांचे बलीदान यावर बोलुन त्यांना कमी दाखविण्याचा प्रयत्न करत असाल. तर हे चुकीचं आहे. त्यावेळी मुंबई पोलिसांनी जीवाचा विचार न करता आपल्याला वाचविण्याचे काम केलं त्यांचे बद्दल बोलणं चुकीचं आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत.