उत्तर-मध्य मुंबईतून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवर भाष्य केलं आहे. उत्तर-मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माणूस म्हणून त्यांच्यावर काही आक्षेप घेता येणार नाही. लोकांना त्यांच्या माध्यमातून एक चॉईस आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीवरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निकाल हे घासून लागणार आहेत. आम्हाला मात्र फायदा होणार आहे. आम्हाला चिन्ह आम्हाला मिळणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्पात आम्हाला जास्त जागा मिळणार असा दावा भाजप पण करताना दिसत नाही. नरेंद्र मोदींच्या सभांचा काही फायदा होणार नाही. उलट मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा आम्हाला फायदा होणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये 2014 मध्ये भाजपला जो एक लाख दीड लाख मतदान मिळाले होते. तसं यंदा आता दिसत नाही. 2024 मध्ये नवीन तरुण भाजपकडे आहे असं दिसत नाही. मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. जे कमी झालेले मतदान हे भाजपचे आहे. त्याचा परिणाम भाजपला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे भाजप कुठेही म्हणत नाही. आमचं वर्चस्व आहे, असं म्हणत नाही. काही ठिकाणी काँग्रेस आणि काही भाजप यांच्यात लढत होत आहे. जो कुणी जिंकेल तो 25 हजारांच्या फरकाने जिंकेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
काँग्रेसला लोकांचा चांगलं पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे शिवसेना आता मुस्लिम मतांकडे वळली आहेत. आम्ही काँग्रेससोबत आहोत आम्हाला मतदान करा, असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. मात्र तुम्ही विधानसभेला काँग्रेससोबत राहणार का? असा विचारत आहेत. 12 मतदारसंघात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढत आहे. याचा आम्हाला फायदा होताना दिसतोय. बारामतीत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आवाहन केल्यामुळे बारामतीत उमेदवार दिला नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.