महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या काळातील कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आम्हाला या निवडणुकीत आशादायी चित्र दिसत आहे. नरेंद्र मोदींच्या 10 वर्षात किती विकास झाला? किती अधोगती झाली? 2014 मध्ये दिलेली आश्वासन पूर्ण झालीत का? त्यांनी जर याची तुलना केली असती तर बरं झालं असतं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत. पुण्यात पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद सुरु आहे. तिथे ते बोलत आहेत.
इंडिया आघाडीचे सरकार येईल तेव्हा ज्यांनी परदेशात काळे लपवले आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. मोदी सरकारकडे यासंदर्भात सर्व कागदपत्रे असताना त्यांनी कारवाई केली नाही. मोदींनी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार, असं आश्वसन दिले होते. मात्र हे फक्त निवडणुकीपुरते आश्वासन देण्यात आले होते, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
नरेंद्र मोदी म्हटले होते की, आतंकवाद संपेल, तो संपला नाही. मागे दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही. मग आता दिलेली आश्वासने कशी पूर्ण होणार? मोदींच्या काळात अर्थव्यवस्थेचा विकास मंदावलेला आहे. ते मान्य करत नाहीत. ते पाठ थोपटून घेतात. देशावर 206 लाख कोटींचं कर्ज आहे. आर्थिक नैतिक भ्रष्टाचार सुरु आहे, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
नरेंद्र मोदींनी ऑपरेशन कमळ केलं. आमदारांची-खासदारांची खरेदी-विक्री केली. आमदार त्यांच्यासोबत गेले. पण मतदार गेले नाहीत. नरेंद्र मोदी हुकुमशाहीच्या दिशेने जात आहेत. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव होणं गरजेचा आहे, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
शेतकऱ्यांच्या जीवनात मोदी सरकारने विष कालवलं आहे. कुणाशी चर्चा नकरता मोदी सरकारने शेती कायदे केलेत. निर्यात बंदीमुळे शेती पिकाचे भाव पडलेत. नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना सूड उगवत आहेत. शेती कायदे मागे घ्यावे लागलेय. त्यामुळे मोदी सरकारचा अपमान झाला आहे. त्यामुळे सूड उगवला जात आहे. नरेंद्र मोदींनी जनतेला अहवाल दिला पाहिजे. त्यांनी दिलेल्या आश्वासन का पूर्ण करू शकला।नाहीत याचा अहवाल द्यावा. मोदींच्या काळात अर्थव्यस्थेचा दर मंदवला आहे. मतांच्या विभाजनासाठी भाजपकडून वंचितसारखा प्रयोग करण्यात आला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.