पुणे : पुणे रेल्वे स्थानकात (Pune Railway Station News) आढळलेल्या संशयास्पद वस्तू आढळून आली होती. ही वस्तू बॉम्बसदृश्य नसल्याची माहिती सुरुवातील पुणे पोलिसांनी दिली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी ही वस्तू बॉम्बसदृश्य नसल्याचं सुरुवातील म्हटलं होतं. मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ही वस्तू हस्तगत केली. त्यानंतर एका खुल्या मैदानात ही वस्तू आणण्यात आली होती. बॉम्बनाशक (Bomb squad) पथकाकडून ही वस्तू खुल्या मैदानात ठेवण्यात आली होती. त्यानंतर आजूबाजूचा परिसरही रिकामी करण्यात आला होता. पन्नास ते साठ फूट अंतरवर एक वायर या वस्तूला लावण्यात आलेली. गोण्या आजूबाजूला ठेवल्याचं दिसून आलंय. त्यानंतर एक मोठा आवाज होत स्फोट झाला. बॉम्बनाशक पथकाकडून हा स्फोट घडवून आणण्यात आला आणि ही वस्तू निकामी करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय.
दरम्यान, ही वस्तू बॉम्बसदृश्य नव्हती, यात जिलेटिन कांड्या नव्हत्या, तर मग बॉम्ब पथकानं ही वस्तू निकामी करण्याचं कारण काय? हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आता पोलिसांकडून याबाबत अधिक तपास केला जातेय. मात्र तूर्तास ही वस्तू निकामी करण्यात आली आहे.
पुणे रेल्वे स्थानकात एक बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. सकाळी दहा साडे दहा वाजण्याच्या सुमारात ही बाब समोर आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्टेशन पिंजून काढलं होतं. प्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन रिकामी करण्यात आलेला. बंदोबदस्तातही वाढ करण्यात आलेली. दरम्यान, बॉम्बनाशक पथकालाही तैनात करण्यात आलेलं. या वेळी रेल्वे स्थानकातली वाहतूकदेखील थांबवण्यात आली होती.
यानंतर रेल्वे स्थानकात आढळेली वस्तू नेमकी काय होती, यावरुन संभ्रम निर्माण झालाय. अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. मात्र एका मोकळ्या मैदानात ही वस्तू निकामी करण्यात पोलिसांना यश आलं आहे. जर ही वस्तू बॉम्बसदृश्य नव्हती, तर तिचा स्फोट घडवून आणण्याचं कारण काय? बॉम्बनाशक पथकाकडून नेमकं या वस्तूबाबत काय खुलासा केला जातो, याकडे आता सगळ्यांची नजर लागली आहे.
दरम्यान, नुकतील पुणे स्थानक उडवून देण्याची धमकी दोघांनी दिली होती. 3 मे रोजी पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन धमकी देणाऱ्यांमुळे एकच खळबळ उडाली होती. पैसे नाही तर दिले तर रेल्वे स्टेशन उडवून देऊ अशी धमकी देणाऱ्या दौघांना पोलिसांनी अटकही केली होती. ही घटना ताजी असतानाच आता रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी गूढ वाढवलंय.
पन्नास ते साठ फूट अंतरावर वायर लावण्यात आली होती. बॉम्बनिकाली पथकाकडून ही वस्तू निकामी करण्यात आली आहे. मोठा आवाज यावेळी झाला. एक स्फोट घडवून आणण्यात आला. त्यानंतर ही वस्तू निकामी करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर आता पोलीस स्टेशन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आलाय. प्रथमदर्शनी ही वस्तू स्फोटकांसारखी नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याचा आता तज्ज्ञ पथकाकडून तपास केला जाणार आहे. त्यानंतर अधिक माहिती देण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.