शरद पवार मुख्यमंत्री कृषीमंत्री झाले. पण त्यांनी अर्थ खातं कधीच सांभाळलं नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्याला आता खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे. शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांच्याकडे राज्यसह देशाच्या अनेक जबाबदाऱ्या राहिलेल्या आहेत. शेती खाता त्यांच्याकडे असताना त्यांनी हरित क्रांती करून दाखवली. त्याची नोंद काँग्रेसने घेतली पण विरोधात असणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा घेतली. त्यांच्या कामासाठी त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना करून दिली.
शरद पवार गृहमंत्री होते. तुम्ही महाराष्ट्रात जाऊन बघा…. अनेक शाळा पवार साहेबांच्या काळात आलेल्या आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर सर्वात जास्त एमआयडीसी पवार साहेबांच्या काळात झालेल्या आहेत. शिक्षण आरोग्य सेवा, महाराष्ट्राची सर्वात जास्त डेव्हलपमेंट झाली. मुख्यमंत्री असताना त्यांना काम करण्याची खूप मोठी संधी मिळाली त्यांनी स्वतःहून कधीच फायनल मिनिस्टर घेतली नाही. ते ती जबाबदारी घेऊ शकत होते. मात्र ती संधी त्यांनी दुसऱ्यांना दिली. याचे उत्तर पवार साहेबच देऊ शकतील. शेवटी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतला जातो, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी विधान केल्याप्रमाणे निवडणुका न झाल्याने ग्रामीण आणि शहरी भागात विकासकामं होतं नाही. पंचायत राज, सत्तेच विकेंद्रीकरणं, कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं स्वप्न होतं की सत्ता ही केंद्रित राहता कामा नये. तीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. हेच अनेक वर्ष आपण महाराष्ट्रमध्ये करत आलोय. ट्रिपल इंजिन खोक्याच्या सरकारनी बरोबर याच्या विरोधात कामं केलंय, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
कालच्या दिवसात महाराष्ट्र सरकारकडून दोन स्टेटमेंट आलीयत. देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलंय सरकारमध्ये फाईल गोगलगाई प्रमाणे चालतीय. हात लावून त्याला धक्का मारावा लागतो. हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द आहेत. हा गमतीचा भाग आहे. हात लागल्या शिवाय या सरकारमध्ये फाईल चालत नाही. ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कामं होतं नाहीत, ही देवेंद्र फडणवीस यांनीच कबुली दिली आहे.