महाराष्ट्र माज खपवून घेतं नाही, शिंदे गटाचा धुआँ निघणार; कुणाची भविष्यवाणी?

| Updated on: May 26, 2024 | 4:02 PM

Ravikant Tupkar on CM Eknath Shinde Shivsena : अजित पवार यांच्याबद्दल बोलणार नाही. तो त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या परिवाराचा विचार आहे. तरुण या सगळ्याला कंटाळले. म्हणून त्यांनी मला साथ दिली, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत. रविकांत तुपकर काय म्हणाले? वाचा सविस्तर...

महाराष्ट्र माज खपवून घेतं नाही, शिंदे गटाचा धुआँ निघणार; कुणाची भविष्यवाणी?
CM Eknath Shinde
Follow us on

शिंदे गटाचा महाराष्ट्रात धुआँ निघणार आहे. महाराष्ट्र माज खपवून घेत नाही. सत्तेचा माज शिंदे गटाला आहे. त्यांचा धुवा उडणार आहे. सगळ्यांच पक्षाच धुसफूस आहे. एकमेकांच्या विरोधात लढले वरच्या नेत्यांनी युती केली. जिरवा-जिरवीच्या राजकारणात व्यस्त आहेत. एकनाथ शिंदेंनी खूप पैसे वाटले, उदय सामंत नावेच मंत्री फक्त पैसे वाटायला होते. हजारो कोटींचा वापर एकनाथ शिंदेंनी केला. हेलीकॉप्टरने पैसे वाटले. दादागिरीने राजकारण होत नाही. नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते, असं म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

राज्याच्या राजकारणावर भाष्य

महाराष्ट्राला नवा पर्याय देण्याची गरज आहे. राज्याचा दौरा करणार आहे. गरीब, वंचित, तरुणांना राजकारणात आणणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर फक्त राजू शेट्टी लढले. मी अपक्ष होतो.कुठल्याही माणसाने ज्योतिष वर्तणं बरोबर नाही.सगळेच दावे करतात आम्ही येणार मी असे दावे करणार नाही. जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल, असं रविकांत तुपकर म्हणाले.

जनता तुम्हाला जागा दाखवणार आहे. बुलढाण्याची फाईट टफ आहे. पण 25 वर्षे मी काम करतोय. त्यामुळे जनता संधी देईल. मी स्वतंत्र राहणार आहे. काही नेत्यांनी माझी अफवा उडवली. सामान्याचा मुलगा प्रस्थापीत मुलाने नेत्यांचा मेक-अप उतरवला. शेतकऱ्यांना माझ आव्हान आहे तुम्ही जागरुक व्हा… सरकार कोणतही असो शेतकरी विरोधात निर्णय घेतात, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

नवीन पक्ष काढणार?

रविकांत तुपकर नवीन पक्ष काढणार असल्याची चर्चा आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. माझ्या डोक्यात असा विचार नाही. पण प्रस्थापितांच्या चळवलीचा स्पेस तरुणांना खुणावत आहे. तरुण एकत्र येऊन नवीन पर्याय देणार आहे. पक्ष म्हणून असं नाही पण सगळ्यांची मोट बांधू. राजकारणात सामान्यांच्या पोरांनी का येऊ नये. चांगल्या विचाराचे लोक राजकारणात आले पाहिजेत, असं रविकांत तुपकरांनी म्हटलं आहे.