पुण्यातील रिंग रोड प्रकल्पबाधितांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला?

| Updated on: Jun 24, 2021 | 8:09 AM

पुणे रिंग रोड प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन मार्ग तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पातील पूर्व मार्गासाठी 859 हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे, तर पश्चिम मार्गासाठी 763 हेक्टर भूसंपादन करावे लागणार

पुण्यातील रिंग रोड प्रकल्पबाधितांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला?
Pune Ring Road
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्यात एमएसआरडीसी अंतर्गत रिंग रोड (Pune Ring Road) तयार करण्यात येत आहे. प्रकल्पातील बाधितांना नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) धर्तीवर बाजार मूल्यानुसार मोबदला देण्यात येणार आहे. या प्रकल्पात जाणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन आणि दर निश्चित करण्यासाठी आज (गुरुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. (Pune Ring Road Project affected Villagers to get Compensation as per Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg)

पुणे रिंग रोड प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन मार्ग तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पातील पूर्व मार्गासाठी 859 हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. हा मार्ग 104.9 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोरमधील 46 गावांत भूसंपादन केले जाणार आहे.

पूर्व मार्गाची वैशिष्ट्यं काय?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, नाशिक, सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणार

सहा पदरी महामार्गावर एकूण 7 बोगदे, 7 अंडरपास, दोन नद्या आणि दोन रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी पूल

भूसंपादनासाठी अंदाजे खर्च 1434 कोटी रुपये

एकूण खर्च 4713 कोटी

पश्चिम मार्ग कसा असणार?

दुसरीकडे, पश्चिम मार्गासाठी 763 हेक्टर भूसंपादन करावे लागणार असून हा मार्ग 68.8 किमी. लांबीचा आहे. या मार्गासाठी भोर, हवेली, मुळशी आणि मावळ या चार तालुक्यांमधील 37 गावांत भूसंपादन करावे लागणार आहे. पश्‍चिम भागात जमीन मोजणीचे काम सुरु झाले आहे. प्रत्यक्ष भूसंपादन करण्यापूर्वी मूल्यांकन करणे आवश्यक आहे. आता पूर्व भागातील रिंगरोडसाठी लागणाऱ्या जमिनींच्या मोजणीसाठी मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

समृद्धी महामार्गाचे काम सुरु

दुसरीकडे, जवळपास 56 हजार कोटी रुपये खर्चून मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील 710 किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांमधील 27 तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित

(Pune Ring Road Project affected Villagers to get Compensation as per Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg)