Pune School Reopen : पुण्यातल्या शाळा सुरु होणार का? निर्णयासाठी आजचा दिवस मोठा, अजित पवारांची बैठक

| Updated on: Jan 22, 2022 | 10:08 AM

पुणे जिल्ह्यातील शाळा (Pune School Reopen) आणि निर्बंधाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत निर्णयाची शक्यता आहे.

Pune School Reopen : पुण्यातल्या शाळा सुरु होणार का? निर्णयासाठी आजचा दिवस मोठा, अजित पवारांची बैठक
ajit pawar
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्यातील शाळा (Pune School Reopen) आणि निर्बंधाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत निर्णयाची शक्यता आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील नियम लागू करुन शाळा सुरु करण्याची मागणी केली आहे. यापार्श्वभूमीवर आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह जिल्ह्यत कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीला दोन्ही महापालिका आयुक्त, महापौर उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्यात काल 16 हजार 618 कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची रुग्णासंख्या वाढत असली तरी शहरातील शाळा सुरु कराव्या लागणार आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळा, विद्यार्थ्यांचे स्लॉट पाडावेत ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे तिथे 10 विद्यार्थ्यांना बोलवावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

पुणे शहरात शुक्रवारी 8301 कोरोना रुगण

पुण्यात शुक्रवारी दिवसभरा 8301 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झालीय. दिवसभरात रुग्णांना 5480 डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात करोनाबाधित 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील ०६ एकूण 10 मृत्यू झालाय. पुण्यात सध्या 297 जण ॲाक्सिजनवर आहेत. तर, इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 47 जण, नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 27 जण उपचार घेत आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 45 हजार 81 सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत 9172 जणांचा मृत्यू झाला आहे.

पालक, डॉक्टर, टास्क फोर्सची मतं विचारात घेतली जाणार

पुण्यातील शाळांचा निर्णय आज होणाऱ्या अजित पवारांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. पालक , डॉक्टर, टास्क फोर्स यांची मतं विचारात घेतली जाणार आहेत. आठवड्यापासून पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढतीय. या सगळ्यांचा विचार करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली होती.

पुण्यातील शाळा सुरु करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोरोनाची रुग्णासंख्या वाढत असली तरी शहरातील शाळा सुरु कराव्या लागणार आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळा, विद्यार्थ्यांचे स्लॉट पाडावेत ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे तिथे 10 विद्यार्थ्यांना बोलवावे. अभ्यासक्रम कामे करावेत शहरतील शाळा सुरु करण्याच्या आधी नियम ठरवावेत अशी विनंतीही त्यांनी अजित पवार यांना केली.ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले तरी उद्योगधंदे सुरूच राहले आहेत. असे मत चंद्रकांत पाटीलांनी व्यक्त केलं आहे.

इतर बातम्या :

पुण्यात अजित पवार VS चंद्रकांत पाटील, अजित पवारांवर आरोप करत पाटील म्हणतात…

पुणेकरांना हुडहुडी, राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान खात्याचा अंदाज काय ? वाचा

 

Pune School Reopen Ajit Pawar will take corona review meeting today big decision expected today on Pune School