लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. अशात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यानंतर सुनेत्रा पवार आज मतदारसंघात गावभेट दौरा करत आहेत. सुनेत्रा पवार सलग दुसऱ्या दिवशी बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज मुळशीमधील बावधन परिसरातील विविध सोसायट्यांना त्या भेटी देत आहेत.
सुनेत्रा पवार सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. दौऱ्यादरम्यान नागरीकांच्या भेटी घेत त्या घेत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत आहेत. सुनेत्रा पवार त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. यावेळी विकासाशी बांधिलकी जपणाऱ्या अजितदादांच्या विचाराचा खासदार व्हावा. यासाठी घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन त्या ठिकठिकाणी करत आहेत. कालच बारामती लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर आज त्या मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्व भूमीवर गेल्या 20-25 दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघात गावाभेट दौरा करत आहे. कालच महायुतीकडून मला उमेदवारी देऊन जवाबदारी दिली आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेल. उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आभार. पक्षाच्या आणि मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असं सुनेत्रा पवार यावेळी बोलताना म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरात विकास पुरुष म्हणलं जातं. याचं विकासाचा धागा धरून अजित पवारांनी याचा पाईक होण्याचं ठरवलं आहे. आपलं चिन्ह घड्याळ आहे. घड्याळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान… त्यामुळे यंदा घड्याळाला मतदान करा…, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी मतदारांना केलं आहे.
पाण्यासह अनेक अडचणी नागरिकांनी आत्ता सांगितल्या आहेत. त्या जितक्या लवकर सोडवता येतील. तितक्या लवकर सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपण मतदान करणं गरजेचं आहे. आपला विश्वास मी सार्थ ठरवेन, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.