इंदापूरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता आज झाली. या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच स्थानिकांना आवाहन केलं. काही गोष्टी अशा असतात, त्या पोटातचं ठेवायचे असतात. कारण नाती तोडायला नाही तर जोडायला कष्ट लागतात. माझ्या आजीने जोडून ठेवलेली नाती दिल्लीतले सुई घेऊन तोडायचा प्रयत्न करतायेत. आमचं चिन्ह बदललं आहे. 3 नंबरला माझं नावं आहे. तुतारी वाजवणारा माणूस समोरच बटन दाबून मला विजयी करा… रामकृष्ण हरी वाजवा तुतारी…, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यंदाच्या वेळेस आपलं फक्त चिन्ह बदललं आहे. चिन्ह गेल्यावर माझ्या पांडुरंगाने माझ्या पदरात तुतारी टाकली. हे युद्ध महागाई, बेरोजगारी विरोधात आहे. आधी म्हणायचे राष्ट्रवादी करप्त पार्टी आहे. आता म्हणतात पुत्र, पुत्री प्रेमामुळं पार्टी फुटली… आमची पार्टी भ्रष्टाचार मुक्त केल्याबद्दल आभार… लोकसभेच तिकीट मागितले असते तर दिल खोलके दिले असते. रोज आमच्या घरातले महिलेला बाहेर काढतात… अरेला कारे म्हणायला ताकद नाही लगत, गप्प बसायला लागतं. नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्यासोबत चांगलं असेलं तर कांद्याच्या भावासाठी एकदा तरी फोन फिरवा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विरोधक म्हणतात 10 वर्ष मी काही कामं केलं नाही. माझं पुस्तक वाचल असत तर तुम्हीच मला मतदान केलं असतं. इतक्या वर्ष तुमच्या विचारच सरकार होतं. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा अशी मी वागले आणि आज तुम्ही माझ्यावर टीका करतात. मी फार आरोप करणार नाही कारण खरं सत्य त्यांनाही माहिती आणि मलाही माहिती आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरु असतानाच अजान झाली. अजाणचा आवाज आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी काहीवेळासाठी भाषण थांबवलं.
आम्ही आमच्या खिशातल्या पैशाने विकास नाही करत. तुम्ही टॅक्स भरता त्यातून विकास कामं होतात. आपल्या विचारचं सरकार केंद्रात असलं तर विकास होतो असं म्हणता तर… सांगली आणि सोलापूरला गल्ली पासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, तिथं पाण्याचा प्रश्न सुटला का?.. बाकीच्या प्रश्न सुटले का? काय विकास झाला? सोलापूरला म्हणतात एक रुपयांचा कढीपत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता असं म्हणतात… 30-35 सिट महाराष्ट्रमध्ये माविआच्या येणार आहेत, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
ते म्हणतात समोरचे येतील आणि म्हणतील शेवटची निवडणूक म्हणून रडतील आणि मतं मागतील… शेवटचं इलेक्शन आहे की नाही हे तुम्ही नाही ठरवायचं… तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही बारामतीला किती दिवसं येता ते बघा आधी, भोरला वर्षातून एकदा… चाव्या आमच्याकडे आहे म्हणता.., असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.