Pune ST : लालपरी पुन्हा सुसाट..! प्रवाशांना सेवा देताना आनंद होत असल्याचे म्हणत पुण्याच्या स्वारगेट डेपोतले कर्मचारी परतले कामावर!

| Updated on: Apr 20, 2022 | 10:07 AM

पुणे जिल्ह्यात एसटी (ST) वाहतूक आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 13 डेपोमधील जवळपास चार हजार कर्मचारी आतापर्यंत कामावर परतले आहेत. स्वारगेट (Swargate) डेपोतील 350 ते 400 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

Pune ST : लालपरी पुन्हा सुसाट..! प्रवाशांना सेवा देताना आनंद होत असल्याचे म्हणत पुण्याच्या स्वारगेट डेपोतले कर्मचारी परतले कामावर!
स्वारगेट आगातील सुरू झालेल्या बस
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्यात एसटी (ST) वाहतूक आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 13 डेपोमधील जवळपास चार हजार कर्मचारी आतापर्यंत कामावर परतले आहेत. स्वारगेट (Swargate) डेपोतील 350 ते 400 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. स्वारगेट डेपोतून लांब पल्ल्यासह जिल्हाअंर्तगत एसटी वाहतूकही सुरू झाली आहे. मागील 5-6 महिन्यांपासून सुरू असलेला संप आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल या सर्वांना आता पूर्णविराम मिळाला आहे. जवळपास सहा महिन्यांनंतर एसटी कर्मचारी कामावर परत यायला सुरुवात झाली आहे. एसटी प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल बोलताना, सहा महिने आम्ही दुखवट्यात होतो. आता कामावर परत आलो आहोत, प्रवाशांना सेवा (Service) देताना आनंद होत आहे. बहुतांशी मागण्यात तर मान्य झाल्या आहेत. मात्र उर्वरित मागण्याही पूर्ण कराव्यात, असे एसटी कर्मचारी यावेळी म्हणाले आहेत.

एकूण चार हजारांहून अधिक कर्मचारी हजर

पुणे विभागात रविवारपर्यंत 1 हजार 892 कर्मचारी कामावर हजर झाले होते. तर 2 हजार 300 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. मात्र त्यातीलही अनेक कर्मचारी पुन्हा हजर झाल्यामुळे एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. रविवाी विभागातील 11 डेपोतून गाड्या सुरळीत सुरू झाल्या. तर आज जिल्ह्यातील 13 डेपोमधील जवळपास चार हजार कर्मचारी आतापर्यंत कामावर परतले आहेत. तर स्वारगेट डेपोतील 350 ते 400 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. उच्च न्यायालयाने एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

अनिल परब यांनी नुकतीच घेतली होती बैठक

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी पूर्ववत सुरू होण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक आढावा बैठक घेतली होती. संपामुळे गेले 5-6 महिने एसटीच्या गाड्या उभ्या होत्या. यापैकी काही गाड्या नादुरूस्त असतील त्यासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीची चर्चा यात झाली होती. त्याचबरोबर एकूणच एसटी आणि समस्या यावरही यात चर्चा झाली होती.

एसटीचे कर्मचारी काय म्हणाले?

आणखी वाचा :

Pune crime : पैसे देऊन मिळतंय दिव्यांग प्रमाणपत्र! पुण्यातल्या ससून रुग्णालयात होतोय काळाबाजार

Devendra Fadnavis : ‘आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरण्याची गरज नाही’, फडणवीसांचा शिवसेनेला टोला, पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं

Lt Manoj Pandey Batchmate : असाही योगायोग, लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख बॅचमेट, तिघांचही पुणे कनेक्शन, ले. जनरल मनोज पांडेंच्या नियुक्तीनं सर्कल पूर्ण