पुणे | 10 ऑगस्ट 2023 : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अशातच त्यांच्या या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता संभाजी भिडे यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुण्यात संभाजी भिंडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. यावेळी तुषार गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी संभाजी भिडे आणि आरएसएसवर टीका केली आहे. यावेळी अॅड. असिम सरोदे हे देखील त्यांच्यासोबत होते.
आक्षेपार्ह पद्धतीची वक्तव्यं करण्याची संभाजी भिंडे यांची हिंमत नाही. संभाजी भिंडे यांचा बोलविता धनी आरएसएस आणि नागपूर आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात एक आणि सभागृहाच्या बाहेर वेगळं बोलतात. संभाजी भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही तक्रारीत केली आहे. संभाजी भिंडे यांनी आमच्या कुटूंबातील महिलांचा अपमान केला आहे, असं ते म्हणाले.
संभाजी भिडे आणि त्याच्या कार्यक्रमाबाबत आम्ही तक्रार नोंदवली आहे. बापू हे पब्लिक फिगर आहेत त्याचवर टीका टीपण्णी होते. पण या माणसाने पुढे जाऊन बापूंच्या आई आणि वडिलांवर टीका केली आहे. आमचा विश्वास न्याय व्यवस्थेवर आहे, असंही तुषार गांधी म्हणाले.
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी संभाजी भिंडेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात अॅड. असिम सरोदे यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली.
त्यांच्या घराण्यातील स्त्रियांचा अपमान आणि तयारी त्यांनी केली आहे. ते आता सुधा गांधी घराण्यातल्या सगळ्या महिलांची बेअब्रू आणि सगळ्या पिढ्यांची बेअब्रू आहेत. त्यामुळे आम्ही तक्रार केली आहे.
कलम 499 अब्रू नुकसानी करणं, अपमान करणं, स्त्रीत्वाचा अपमान करणं, याविषयी आम्ही तक्रार केली आहे. 1153 अ समाजामध्ये शत्रुत्व पसरवणे महात्मा गांधी लोकशाही संविधान यांना मानणाऱ्या लोकांच्या संदर्भात भाव निर्माण करणं. 505 गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा करणं हे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. चौकशी करून आम्ही गुन्हा नोंद करू असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे, असं असीम सरोदे म्हणाले.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, विश्वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी, मेधा पुरव सामंत, अन्वर राजन, संकेत मुनोत, युवराज शहा यांच्या तर्फे संभाजी भिडे आणि अमरावती कार्यक्रमाचे आयोजक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावी, तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये मुख्यतः तुषार गांधी हे महात्मा गांधींचे पणतू देखील आहेत.