पुण्यातील अपघात प्रकरणातील आरोपीचं पबमधील CCTV फुटेज समोर, पाहा व्हिडीओ

| Updated on: May 21, 2024 | 4:14 PM

Pune Vedant Agarval CCTV Footage : पुण्यातील कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघातातील आरोपीचं मद्यपान करतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. आता या घटनेला दोन दिवस झाले मात्र अजुनही आरोपीचे ब्लड रिपोर्ट आले नाहीत.

पुण्यातील अपघात प्रकरणातील आरोपीचं पबमधील CCTV फुटेज समोर, पाहा व्हिडीओ
Pune Vendant Agarval Accident Case CCTV Footage
Follow us on

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाताची राज्यभर चर्चा सुरू आहे. बड्या उद्योजकाचा मुलगा वेदांत अग्रवाल याने दोन जणांना आपल्या कारने धडक देत संपवलं. शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर अवघ्या 15 तासांच्या आतमध्ये त्याचा सशर्त जामीन मंजुर झाला. आता हे प्रकरण आणखी चिघळलं असून वेदांत अग्रवालवर कारवाईची मागणी होत आहे. अशातच वेदांत याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो ड्रिंक करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह ठेवलं जात आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

वेदांत अग्रवाल आपल्या मित्रांसोबत पार्टी करून झाल्यावर घरी जाताना त्याने आपल्या पोर्शे कारने पल्सर या टू-व्हीलरवर असलेल्या तरूण-तरूणींनी धडक दिली. वेदांत याच्या गाडीचा वेग हा दोनशेच्या आसपास असल्याचं सांगितलं. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत टू-व्हीलरवर असलेले अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. धडक झाल्यावर वेदांतला तिथे जमलेल्या जमावाने मारहाण केली होती.

पाहा व्हिडीओ-

 

व्यवस्थेला पैश्यांची टेस्ट आवडली ,मग मुलाची Alcohol test निगेटिव्ह आली. माणूस म्हणवण्याच्या देखील लायकीचे नाहीत ही लोकं, असं ट्विट रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे. त्यासोबतच त्यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.

या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या वेदांत याची १५ तासांच्या आतमध्ये जामीनावर सुटका झाली. त्यामुळे वातावरण आणखी बिघडलं, कारण दोन जणांना जीव घेणारा आरोपी इतक्या लवकर बाहेर आल्याने लोकांमध्ये संताप निर्माण झाला. सोशल मीडियावर पोलीस यंत्रणा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करू लागले. अखेर या प्रकरणामध्ये वेदांतचे वडील विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे.