पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड लोकप्रियता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जिकडे असते तिकडे एसपीजीची सुरक्षा कडक असते. सभेच्या बाहेर हजारो लोकं बाहेर होती. पुण्यात मोठी सभा झाली आणि मोदी सिद्ध विकासावर बोललेत. पुणेकर कालच्या सभेवर खुश आहेत. काही विरोधक सभेला लोकं पाठवत असतात, आणि सभेतून उठून जायचं. त्यांचे कॅमेरामन असतात. पुण्यात एक लाख लोकांची सभा, कुणीही घेऊन दाखवावी, असं आव्हान विजय शिवतारे यांनी दिलं विरोधकांना दिलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
कालच्या सभेला उस्फुर्त लोकं आले होते. नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी आले होते. नाना पटोले काय बोलतात खोटा आरोप करतात. विरोधकांनी जर आरोप केले नाहीत तर त्यांचं दुकान कशी चालणार, असं म्हणत शिवतारेंनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भटकती आत्मा हे जनरल वक्तव्य होतं. कुणाला एकाला टार्गेट केलं असं बोलणं चुकीचं आहे. कालपासून भटकती आत्मा असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. शरद पवारांवर टीका केली असेल, असं म्हणणं चुकीचं आहे, असंही शिवतारे म्हणाले.
सासवडमध्ये जी आमची सभा झाली. हजारो लोकांची गर्दी होती. संजय राऊतांना माझं खुलं आव्हान आहे. तुम्ही रेसकोर्स मैदानावर सभा घेऊन दाखवा. संजय राऊत यांना सिझोफेनियाची लक्षणे दिसतायेत. संजय राऊतांना रात्री स्वप्न पडतात. दुसऱ्या दिवशी काय बोलतात त्यांनाच कळत नाही. सुनेत्रा पवार प्रत्येक मतदारसंघात लीड घेणार आहेत. ही निवडणूक भावकी आणि गावकीची नाही, ही लढाई मोदी आणि राहुल गांधी यांच्यात लढाई आहे, असंही शिवतारे म्हणाले आहेत.
उद्या संध्याकाळी 6 वाजता भोर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मोठी सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून भोर मतदारसंघातील प्रश्न सोडवले जाणार आहेत. वाघोली आणि वारजे या दोन ठिकाणी नितीन गडकरी यांच्या सभा होणार आहेत. अमित शाह यांची एक सभा बारामती लोकसभा मतदारसंघात होणार आहे, अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली.