राष्ट्रवादीच्या आमदाराने मतदारसंघासाठी पुकारले आंदोलन; समस्यांची यादीच दाखवली वाचून

| Updated on: Apr 04, 2023 | 7:25 PM

आंदोलन पुकारल्यानंतर त्यांनी दुसराही इशाराही दिला आहे की, लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराने मतदारसंघासाठी पुकारले आंदोलन; समस्यांची यादीच दाखवली वाचून
Follow us on

पुणे : राज्यात सत्तांतर झाल्यापासून अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार महाविकसा आघाडी आणि मित्र पक्षावर अन्याय करत असल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. विकास निधी देत नाहीत, मतदार संघाच्या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते असा आरोप वारंवार केला जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष आणि प्रशासन असा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आमदार सुनील टिंगरे यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधले कगेले आहे.

आमदार सुनील टिंगरे यांनी प्रशासनावर टीका करत त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. सुनील टिंगरे यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर टीका केली आहे.

प्रशासनामुळे आपल्या मतदार संघाचा विकास खुंटला असल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे. त्यामुळे आता सरकार विरोधात राष्ट्रवादी असे युद्ध रंगल्याने या आंदोलनामुळे नेमकं आता काय होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी हे आंदोलन पुकारण्याआधी आपण सरकारकडे आणि प्रशासनाला आपल्या मतदार संघातील समस्या सांगितल्या होत्या.

मात्र मला जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम केलं जात असल्यामुळे विकासकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सुनील टिंगरे यांनी सांगितले की, वारंवार पाठपुरावा करूनही माझ्या मतदारसंघातील कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, सरकारवर मी काही बोलणार नाही मात्र प्रशासन माझ्या मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न मार्गी लावत नाही.

त्यामुळे प्रशासनाविरोधात 6 तारखेपासून मी महापालिकेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. हे आंदोलन पुकारल्यानंतर त्यांनी दुसराही इशाराही दिला आहे की, लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.