यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विविध घडामोडी घडत आहेत. जसजसं निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. तसं तसं घडामोडींना वेग आला आहे. ऐन निवडणूक काळात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने वेगळी भूमिका घेतली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात या नेत्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पुणे जिल्ह्यातील भोरच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भोर शहराध्यक्ष यशवंत डाळ यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
पुण्यातील भोरच्या स्थानिक नेत्यानं अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भोर शहर अध्यक्ष यशवंत डाळ यांनी सुप्रिया सुळे यांची साथ सोडली आहे. सुप्रिया सुळे यांची साथ सोडत पुण्यात यशवंत डाळ यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.
यशवंत डाळ यांच्यासोबत आणखी काही नेत्यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला आहे. भोर तालुक्यातील शरद पवार गटाच्या इतर चार महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. नितिन थोपटे, सोमनाथ ढवळे, बाबू शेटे यांनीही अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशावेळी अजित पवार यांच्यासोबत शिवसेनेचे नेते विजय शिवतारेही उपस्थित होते.
यशवंत डाळ यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची भोर विधानसभा मतदारसंघात ताकद वाढणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ताकद कमी करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. निवडणूकीच्या तोंडावर बारामती लोकसभा मतदारसंघात भोरसभेमध्ये महाविकास आघाडीला सलग दुसरा धक्का बसला आहे.
मागच्या आठवड्यात ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश शिवसेनेत केला होता. त्यानंतर आज शरद पवार गटालाही मोठा धक्का बसला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे. तसं तसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मतदार कुणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं असेल.