पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा जवळपास कोलमडण्याच्या स्थितीत आहे, ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. मात्र, आता पुणे जिल्हा परिषदेने (Pune ZP) लाखो रुपयांचे पॅकेज देण्याची तयारी दाखवूनही डॉक्टर्स मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुण्यात आरोग्य सुविधांपाठोपाठ डॉक्टर्सचाही तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा आहे. (Pune ZP recruitment for MBBS and MD medicine and pediatrics doctors)
पुणे जिल्हा परिषदेला एमडी फिजीशीयन आणि एमबीबीएस डॉक्टर्सची भरती करायची आहे. या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे 30 आणि 100 इतक्या जागा भरायच्या आहेत. आता या दोन्ही पदांसाठी जिल्हा परिषद पगारही बक्कळ देत आहे. एमडी फिजीशीयन या पदासाठी महिन्याला दीड लाख तर एमबीबीएस डॉक्टरांसाठी महिन्याला 90 हजार रुपये मोजण्याची तयारी जिल्हा परिषदेने दाखवली आहे. मात्र, इतके करुनही जिल्हा परिषदेला अद्याप डॉक्टर्स मिळालेले नाहीत.
गेल्या महिन्याभरापासून जिल्हा परिषद पात्र उमेदवारांच्या शोधात आहे. मात्र, डॉक्टर्सनी जिल्हा परिषदेच्या प्रस्तावात विशेष रस दाखवलेला नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषदेने कर्नाटक आणि तेलंगणासह 11 राज्यांमधील वृत्तपत्रांमध्ये या पदांच्या भरतीसाठी जाहिराती दिल्या आहेत. त्यामुळे आतातरी जिल्हा परिषदेचा शोध संपणार का, हे पाहावे लागेल.
पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 587 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 6 हजार 473 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात दिवसभरात 76 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 22 जण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 54 हजार 696 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 1 हजार 267 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
आजच्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 71 हजार 824 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 10 हजार 965 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर 6 हजार 163 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या:
पुण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण; शिवसेनेचा नेता संतापला
Lockdown: राज्यात आणखी कठोर लॉकडाऊन अटळ, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा?
(Pune ZP recruitment for MBBS and MD medicine and pediatrics doctors)