गोड बातमी! पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा

| Updated on: Oct 22, 2021 | 11:50 AM

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण राज्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या नियमांमुळे उत्सवावर बंधने आलेली होती. (punekar can celebrate diwali pahat program, says ajit pawar)

गोड बातमी! पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा
ajit pawar
Follow us on

पुणे: गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण राज्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या नियमांमुळे उत्सवावर बंधने आलेली होती. मात्र, आता ही बंधने शिथील होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.

अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे. दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी पुणेकरांकडून होत होती. त्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे, असं पवार यांनी सांगितलं. गेल्या पंधरा दिवसात लसीकरणात 9 टक्के वाढ झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी

कोरोनाचं संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली असेल तरीही त्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

तर नाट्यगृहे शंभर टक्के सुरू करू

राज्यात सिनेमा थिएटर्स, नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटर सुरू झाल्यानंतर होणाऱ्या परिणामांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. जर रुग्णसंख्या वाढली नाही तर शंभर टक्के क्षमतेने थिएटर सुरू करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मेट्रोसाठी नागपूर पॅटर्न

पुण्यातील उड्डाण पुलाचं काम लवकरच सुरू करण्यात येणरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी स्वत: या पुलाच्या भूमिपूजनाला येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच मेट्रोच्या कामासाठी नागपूर पॅटर्नही वापरण्यात येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आठवडे बाजार सुरू

तसेच पुणे आणि पुणे शहरात आजपासून आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात उद्यापासून आठवडे बाजार सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; पीएफ व्याजाचे पैसे खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात

चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

VIDEO: 100 कोटी डोसचं लक्ष्य खरोखरच पूर्ण झालंय का?; संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

(punekar can celebrate diwali pahat program, says ajit pawar)