पुणे- शहरातील वाहतूक कोंडी(Traffic jam) फोडण्यासाठी व वेगवान वाहतूकसाठी नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपुल (Double flyover) रविवार पासून प्रवासासाठी खुला होणार आहे. शहातील वाहतुकीला यामुळे वेग येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून(From Maharashtra Metro Railway Corporation) पूल महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला असून पुलाच्या विद्युत व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या उड्डाण पुलाचे उदघाटन विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35 ते 40 हजार वाहने जा-ये करतात. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते.
या दुमजली पुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. महापालिकेच्या सन 2017-18 अंदाजपत्रकात दुमजली उड्डाणपुलाची संकल्पना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. जयपूर येथील दुमजली उड्डाणपुलाच्या धर्तीवर शहरात उभारण्यात आलेला हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल आहे.
या उड्डाण पुलामुळे डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला गती मिळणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35 ते 40 हजार वाहने जा-ये करतात. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे.
अशी आहे उड्डाणपुलाची रचना
पुलाची एकूण लांबी 550 मीटर
पुलावरून 4 पदरी वाहतूक
पहिल्या मजल्यावरून वाहने, दुसऱ्या मजल्यावर मेट्रो
मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्प
अमेरिकेची शिष्टाई आली कामी; UAE ने उत्पादन वाढीच्या संकेतांनी खनिज तेलाच्या किंमती घसरल्या
क्षुल्लक कारणावरुन वाद, तरुणाची दगडाने ठेचून हत्या, तैमूर गावात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा
Nagpur Crime | कामाच्या शोधात शिवनीवरून कोराडीला आली, पतीच्या मित्रांनीच केला अत्याचार