पुणे – विश्वकर्मा जयंतीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील ज्या श्रम साधकांनी मेट्रो उभी केली त्यांचे आभार व्यक्त करून सन्मान करण्यात आला. मेट्रो चे काम करणाऱ्या श्रम सेवकांचा पुण्यातील गरवारे कॉलेज (Garware College)येथील मेट्रो स्टेशनवर कोथरूडचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांच्या हस्ते पुष्पअभिषेक करण्यात आला. पुण्यातील मेट्रो (Pune Metro)चे मूर्त स्वरूप उभे करताना कोरोना संकटात हि रात्रं दिवस काम करणाऱ्या श्रम साधकांवर चंद्रकांत दादा पाटील यांनी पुष्प अभिषेक करून सन्मान केला.
फुले उधळून व्यक्त केली श्रद्धा
यानिमित्ताने त्यांच्यावर फुले उधळून, त्यांच्या प्रति श्रद्धा व्यक्त केली आणि अभिनंदनहि केले. यावेळी मेट्रोमधील अभियंत्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील बांधकाम कौशल्य असणारे हिरोजी इंदलकर यांच्या नावाची वीट देऊन सन्मान करण्यात आले. मेट्रोचे अतुल गाडगीळ आणि इतर अभियंते,भाजपचे नगरसेवक दीपक पोटे , माधुरीताई सहस्त्रबुद्धे ,मंजुश्री खर्डेकर ,मिताली सावळेकर आदी मान्यवर यावेळी उपथित होते. गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पुणे मेट्रोच्या श्रम साधकांचा हा पुष्प अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता .
होतकरू महिलांना शिलाई मशीनचे मोफत वाट
कोथरूड येथील नवा अंकुश सोसायटीमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये स्मार्ट पुणे फाऊंडेशन यांच्या वतीने होतकरू महिलांना अत्याधुनिक शिलाई मशीन चे मोफत वाटप करण्यात येणार आहे. समाजातील होतकरू आणि गरज असलेल्या महिलांना शिलाई मशीन चे वाटप करून स्मार्ट फौंडेशन ने उत्तम कार्य केले आहे..आपल्या महिला या स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे..समाजातील प्रत्येक नागरिकांना आपण मदत केली पाहिजे भाजपा ने कोविड च्या काळात नागरिकांची मदत केली आहे. त्या प्रमाणे संदीप बुटाला यांनी दोन महिलांना मदत केली आहे..समाजातील जात पात नष्ट झाली पाहिजेअसे मत यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. स्मार्ट पुणे फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, पुनीत जोशी आदी मान्यवर य वेळी उपस्थित होते.
पोलिसांनी अडवलं म्हणून होते तिथंच नाना पटोले यांचं वारकऱ्यांसोबत आंदोलन
मेगा ऑक्शनमध्ये दिसल्यानंतर शाहरूखच्या मुलांची चर्चा, एअरपोर्टवरील फोटो व्हायरल
पोलिसांनी अडवलं म्हणून होते तिथंच नाना पटोले यांचं वारकऱ्यांसोबत आंदोलन