पुणेः राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधत छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करणाऱ्या राज्यपालांची हकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे आणि साताराचे भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आक्रमक पवित्रा घेत असे राज्यपाल आमच्या राज्यातच नको अशी भूमिका घेतली.
त्यानंतर खासदार उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत 3 डिसेंबर रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी जाऊनच आम्ही ठाम भूमिका घेऊ असा निर्णय घेतला.
या सगळ्या बाबतीत राजकारण तापले असतानाच शिंदे गटाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधत विरोधकांना आता राज्यपालांवर टीका करण्याचे एवढेच काम असल्याचे म्हणते राज्यपाल या विषयावर आता पडदा पडायला पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली.
राज्यात आता विरोधकांचे काहीच राहिले नाही. त्यामुळे त्यांनी राज्यपालांच्या नावावरून ते राजकारण करत आहेत अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
विरोधकांना आता कुणी उल्लेखही करत नाही असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे.
खासदार उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यपाल आणि भाजपवर टीका केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्याबद्दल मत व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले की, खासदार उदयनराजे असो किंवा माजी खासदार संभाजीराजे असो त्यांच्या यावेळी त्यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे.
कारण राज्याताली एका आदर्श व्यक्तिमत्वाबद्दल बोलणे चुकीचे असल्याचे सांगत उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या वक्तव्याचे त्यांनी समर्थनीय केले आहे.