पुणे : चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे. मी नगरसेवकांना प्रश्न विचारला तर त्यांचं गुंड मला इथं मारू शकतात. मग, मी काय करणार. पोलीसही त्यांना भेटलेले आहेत, असा प्रश्न एकानं विचारला. जिथं आम्ही राहतो तिथं रोज २५-३० कुत्री भुंकत असतात. तक्रार केली असता पोलिसांनी आम्हालाच दम दिला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, ज्यांच्या हातात तुम्ही सत्ता सोपविली त्याच्या पश्च्यातापाचा हात तुम्ही कपाळावर मारताय. त्यापेक्षा तुम्ही स्वतः या क्षेत्रात या. नागरिक म्हणाला, आम्ही यायला तयार आहोत. तुमच्यासोबत आमुलाग्र बदल घडवून आणू शकतो.
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविणं असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. विकासाची ब्ल्यू प्रिंटही आली. राज विचार सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यात कुठं कमी पडताहेत का. यावर राज ठाकरे म्हणाले, अनेकदा यशाला उत्तर नसतं नि पराभवालाही उत्तर नसतं.
२०१४ ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. खासदार भाजपचे निवडून आले. त्यावेळी भाजपचा कार्यकर्ता घराघरात जाऊन लोकांना पटविलं नव्हतं. एक व्यक्ती असतो. त्यावर विचार करून लोकं मतदान करतात. माणसं काम करतात. जातात, पोहचतात.
यश मिळालं की, सर्व घराघरात पोहचले आहेत, असं म्हणतात. पण, असं नसते. येथील लोकांनी नरेंद्र मोदी यांच्याकडं बघून खासदारांना मदतान केलं असेल. पण, नेत्याकडं बघून मतदान होतं, असा आतापर्यंतचा देशाचा इतिहास आहे. मी जर पटत असेन तर माझ्याकडं बघा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
तुम्ही सामान्य आहात हे कोणी ठरविलं. तुम्ही स्वतःला सामान्य नागरिक समजणं बंद करा, असं एका प्रश्नाच्या उत्तरात राज ठाकरे बोलत होते.