Raj Thackeray : महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का? आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुकीचा राज ठाकरेंनी केला निषेध

| Updated on: Aug 25, 2022 | 12:21 PM

राज्यातील राजकारणावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काल विधान भवनाच्या परिसरात सत्ताधारी त्यातही शिंदे गटाचे आमदार आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा राज ठाकरेंनी निषेध केला आहे.

Raj Thackeray : महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का? आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुकीचा राज ठाकरेंनी केला निषेध
राज ठाकरे
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचा आहे का, असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. विधानभवनाच्या पायऱ्यांवर (Vidhan Bhavan area) झालेल्या धक्काबुक्कीवर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात असे कधी घडले नव्हते. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, असे राज ठाकरे म्हणाले. धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांवर त्यांनी टीका केली आहे. आज राज ठाकरे पुण्यात असून त्यांचे पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये मनसेच्या (MNS) प्राथमिक सदस्य नोंदणीला सुरुवात झाली. यानिमित्त मनसेने शहर कार्यालयाच्या बाहेर मोठी बॅनरबाजी केली आहे. मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक अशी टॅगलाइन या बॅनरवर पाहायला मिळत आहेत. यावेळी त्यांनी स्वत:देखील पक्षात नोंदणी केली.

आमदारांत झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध

राज्यातील राजकारणावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काल विधान भवनाच्या परिसरात सत्ताधारी त्यातही शिंदे गटाचे आमदार आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाचे महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात धक्काबुक्की आणि त्यानंतर दोन्ही बाजूंकडून झालेला गोंधळ महाराष्ट्राने पाहिला. मात्र आपल्याकडे असे कधीच झाले नव्हते. ही यूपी-बिहारकडे वाटचाल असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच या घटनेचा त्यांनी निषेध केला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रभाग रचनेवरून पुन्हा एकदा टीका

प्रभाग रचनेवरून पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी टीका केली आहे. प्रभाग रचना तीन किंवा चारचा केल्यामुळे काम करण्यास अडचणी येतात. प्रभागातील सदस्य संख्या वाढवण्याचे काम पहिल्यांदा राष्ट्रवादीने केले. प्रभाग रचना सातत्याने बदल्याने नगरसेवकांना काम करता येत नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. एका प्रभागात एकापेक्षा जास्त नगरसेवक हवेतच कशाला, असा आक्षेप कालच त्यांनी आपल्या भाषणातून मांडला होता. आज पुन्हा त्यांनी प्रभागरचनेवरून टीका केली. राष्ट्रवादीवर त्यांचा रोख असल्याचे दिसून आले.

मनसेची सदस्यनोंदणी